श्यामलाल हायस्कूलमध्ये कला पंधरवड्याचे उत्साहात उद्घाटन
उदगीर : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था अंतर्गत श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे कला पंधरवडा.
शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या कला पंधरवड्याचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य सर, संस्था सहसचिव श्रीमती अंजुमणी आर्य, संस्था सदस्य अभंगराव कोयले,शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहूल लिमये, जेष्ठ शिक्षक संजय देबडवार, नारायण कांबळे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था नेहमीच अग्रेसर असते, शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडा व कला गुण विकसित झाले पाहिजेत यासाठी संस्थेचे अध्यक्ष अडवोकेट सुपोषपाणि आर्य सर यांच्या संकल्पनेतून कला पंधरवड्यामध्ये चित्रकला, हस्तकला, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, मेहंदी, रांगोळी, विनोद, काव्यरचना, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, तबला वादन, सामूहिक व वैयक्तिक नृत्त्य, विविध वेशभूषा फॅन्सी ड्रेस, सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला इत्यादी विविध विद्यार्थी प्रिय उपक्रमाचे आयोजन कला पंधरवड्यामध्ये केले जाते., या कला पंधरवड्याचे उद्घाटन… उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात करण्यात आले वरील सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपली अभिव्यक्ती सादर करून कलागुणांचा विकास घडवून आणावा असे मनोगत प्रमुख अतिथी गुंडप्पा पटणे सर, पत्रकार रामभाऊ मोतीपवळे,रवी हसरगुंडे, यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले, श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वरील सर्व उपक्रम करत आहे ही बाब शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनुकरणीय आहे असे मत याप्रसंगी प्रमुख अतिथीनी व्यक्त केले.