राजेंद्र हूंजे यांना दर्पण सेवा गौरव तर पत्रकार रामलिंग तत्तापूरे व रंगनाथ वाघमारे यांना ‘दर्पण जीवन गौरव पुरस्कार’..!

0
राजेंद्र हूंजे यांना दर्पण सेवा गौरव तर पत्रकार रामलिंग तत्तापूरे व रंगनाथ वाघमारे यांना 'दर्पण जीवन गौरव पुरस्कार'..!

राजेंद्र हूंजे यांना दर्पण सेवा गौरव तर पत्रकार रामलिंग तत्तापूरे व रंगनाथ वाघमारे यांना 'दर्पण जीवन गौरव पुरस्कार'..!

अहमदपूर (गोविंद काळे) : जेष्ठ पत्रकार, संपादक, माध्यम सल्लागार राजेंद्र हूंजे (माजी संपादक साम टिव्ही,मूंबई)यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार 2023’ जाहीर झाला आहे तर स्थानिक पातळीवर पत्रकार म्हणून कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार रामलिंग तत्तापूरे(पत्रकार दै.लोकसत्ता/लोकमत अहमदपूर) व रंगनाथ वाघमारे(पत्रकार दै.संचार/यशवंत चाकूर) यांना साहित्य संगीत कला अकादमी च्या वतीने ‘दर्पण जीवन गौरव पुरस्कार 2023’ देवून गौरव करण्यात येणार आहे.

साहित्य संगीत कला अकादमी (महाराष्ट्र) अहमदपूर जि.लातूर च्या वतीने प्रत्येक वर्षी पत्रकारीता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस ‘दर्पण सेवा गौरव पुरस्कार दिला जातो. शाॅल-स्मृतीचिन्ह, लेखनी, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या पूर्वी जयप्रकाश दगडे (लातूर),राही भिडे मॅडम (मूंबई),राजा माने (सोलापूर),अशोक सूरवसे (मूंबई),अतुल कुलकर्णी (मूंबई),किरण तारे (मूंबई), यदू जोशी (मूंबई), प्रा.बी.व्हि.मोतीपौळे (लातूर) प्रा.रामेश्वर बद्दर (लातूर)आदींना हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. तसेच अहमदपूर व चाकूर तालूक्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणा-या दोन पत्रकारांची प्रत्येक वर्षी पूरस्कार निवड समितीच्या वतीने निवड करण्यात येते.यंदा जेष्ठ पत्रकार रामलिंग तत्तापूरे(दैनिक लोकसत्ता/लोकमत अहमदपूर ) व रंगनाथ वाघमारे( पत्रकार दैनिक संचार/यशवंत चाकूर) यांना ‘दर्पण जिवन गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.शाल- स्मृतीचिन्ह- मानपत्र पूष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पूर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार मा.रा.कराड,प्रा.एस.एम.कूलकर्णी,अ.ना.शिंदे,उदयकुमार जोशी,संदीप अंकलकोटे,बाबूराव श्रीमंगले, रवीकांत क्षेत्रपाळे,प्रशांत शेटे,सूरेश डबीर,सूधाकर हेमनर, संतोष अचवले,प्रा.मारोती बुद्रुक पाटील,दिनकर मद्देवार,भारतसिंह ठाकूर,बलभीम पवार, विलास चापोलीकर यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पूरस्कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण दिनाच्या निमित्ताने रवीवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी अहमदपूर जि.लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,अजयराव भालेराव, शिवाजीराव गायकवाड, भिमराव कांबळे,गणेशराव मूंडे,प्रशांत जाभाडे,आकाश सांगवीकर,सय्यद याखूब, विलास चापोलीकर,सचिन बानाटे, प्रा.अनिल चवळे, गफारखान पठाण, जीवनराव गायकवाड, मारोती बुद्रुक पाटील, बालाजी कारामूंगेकर, मोहम्मद पठाण,तरबेज सय्यद, प्रा. दिपक बेले, शिवाजी भालेराव, गणेश शिंदे,सय्यद याखूब, राजू सूर्यवंशी, दिलीप भालेराव, प्रा. उध्दव श्रंगारे, सागर क्षीरसागर,ईश्वर कांबळे, बालाजी मस्के,सय्यद नूर,सय्यद नौशाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!