व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य तपासणी शिबीर : 150 कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

0
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य तपासणी शिबीर : 150 कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य तपासणी शिबीर : 150 कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील व्हाईस ऑफ मिडीया संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त एस.टि महामंडळ आगारातील अधिकारी , कर्मचारी यांचे हृदय, नेत्र, अस्थिरोग आरोग्य तपासणी शिबिर दि 5 जाने रोजी घेण्यात आले या शिबीरात जवळपास 150 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना आपले कर्तव्य करीत असताना शारीरिक, मानसिक, बौद्धिक कष्ट करावे लागतात. हे कर्मचारी आपल्या कर्तव्यात व्यस्त असल्याने ते स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास टाळाटाळ होते. या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने ठेवण्यात आली ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ स्थानिक शाखेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी,व औषध शिबिरात देण्यात आले असता ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील,तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा चे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कदम, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने यांची प्रमुख पाहुणे तर उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी ,उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरजमल सिंहाते, आगार प्रमुख अमर पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकांत क्षेत्रपाळे यांची विशेष आमंत्रित म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना राज्यमंत्री जाधव म्हणाले भविष्यातही पत्रकार संघाच्या वतीने असे विधायक उपक्रम घेण्यात यावेत अशा सुचनाही दिल्या.

राज्य परिवहन महामंडळाच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या हृदय, नेत्र, अस्थि, रक्तदाब , शुगर अशा विविध तपासण्या करण्यात आल्या, यावेळी ५० कर्मचाऱ्यांच्या एच.आय.व्ही तपासण्याही करण्यात आल्या. या तपासणीसाठी हृदयरोग तज्ञ डॉ.पांडुरंग कदम, डॉ.चंद्रकांत उगिले ,डॉ.ऋषिकेश पाटील, डॉ.अतुल खडके, डॉ.प्रदीप वट्टमवार ,अस्थिरोग तज्ञ डॉ.सुनील चलवदे, नेत्ररोग तज्ञ डॉ.रामेश्वर चामले, डॉ.गजानन माने, डॉ. लिंगेश्वर बावगे तर स्त्री रोग तज्ञ डॉ.अंजली उगीले, डॉ.मीनाक्षी करकनाळे यांची उपस्थिती होती.डाॅ.सुरजमल सिंहाते यांनी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी,सिस्टर,व औषध घेऊन दोन टिम सह आपणही उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबीरात नेत्र रोग तज्ञ डॉ. दिप्ती चेवले सि. डि.ओ लिंगेश्वर बावगे संचलीत साईराज डोळ्याचा दवाखाना यांच्याकडून एस.टि महामंडळ आगारातील ज्या कर्मचाऱ्यांना चष्मा लागला आहे अश्या जवळपास 60 जणांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकांत क्षेत्रपाळे, प्रा.रत्नाकर नळेगावकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सलीम सय्यद, नरसिंग सांगवीकर, वसंत पवार, शिवाजी पाटील, त्रिशरण मोहगावकर, मेघराज गायकवाड, गोविंद काळे, विश्वनाथ हेंगणे, प्रा. अनिल चवळे यांनी परिश्रम घेतले.एसटी महामंडळातील स.आगार प्रमुख कोकाटे यांचेही चांगले सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *