पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालयास नॅकचे बी प्लस मानांकन प्राप्त
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी (सु) येथील पु अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालयास दि २८ व २९ डिसेंबर रोजी नॅक मूल्यांकन त्रिसदस्यीय समितीने तपासणी केली होती. नॅक मूल्यांकन त्रिसदस्यीय समितीने केलेली तपासणी व सादर केलेल्या अहवालाच्या आधारे सदरील अध्यापक महाविद्यालयास बी प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाचा नावलौकीक व अन्य बाबींसाठी यूजीसीच्या नॅक समितीचे नामांकन आवश्यक असते. प्रथमच नॅकचे बी प्लस असे मोठे यश आले आहे. नॅक समितीने बी प्लस नामांकन दिले आहे.नामांकनासाठी आवश्यक सर्व बाबी तपासण्यात आल्यात. दरम्यान, नॅक समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यानुसार बी प्लस नामांकन देण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था यांचे नॅक मूल्यांकन होणे अतिशय गरजेचे आहे. पण ‘नॅक’ मूल्यांकन ही प्रक्रिया प्रचंड अवघड, क्लिष्ट असते. त्यामुळे अनेक शिक्षण संस्था याकडे दुर्लक्ष करतात किंवा मूल्यांकन करण्यास टाळत असतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा नवा दृष्टिकोन ‘नॅक’मुळे मिळाला. ‘नॅक’ महाविद्यालयांसाठीची कठीण परीक्षा नसून, एक मॉडेल आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ग्रामीण भागातील बी एड महाविद्यालयास बी प्लस मानांकन मिळवणारे हे पहिलेच महाविद्यालय आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, संस्थेच्या सचिव तथा भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखा हाके, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, संस्थेचे कोषाध्यक्ष अमरदीप हाके, कुलदीप हाके तसेच सर्व संचालक मंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ मुकुंद माने, डॉ राजेशखन्ना रंगारी, डॉ एम.शिवकुमार,प्रा मयुरी रत्नपारखी, ग्रंथपाल लोहकरे आनंद,कार्यालय प्रमुख माने कोंडीबा आणि सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.