राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उदयगिरीच्या साक्षी पाटीलचे यश
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील साक्षी पाटील या विद्यार्थिनीने कर्मवीर महाविद्यालय, मुल जिल्हा चंद्रपूर द्वारे आयोजित ‘कर्मवीर कन्नमवार राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेमध्ये’ तृतीय क्रमांक संपादित केला आहे. राज्यस्तरावरील ‘भारतीय लोकशाही आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील निबंध स्पर्धेमध्ये तिने संपादन केलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी स्टाफ सेक्रेटरी ग्रंथपाल डॉ.लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा.डॉ.गौरव जेवळीकर, प्रा.डॉ. बालाजी होकरणे, प्रा. रोहन एनाडले, संग्राम टाले यांची उपस्थिती होती. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.