20 महिन्या पासून बेपत्ता असलेल्या मुलींला शोधण्यात यश
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलीला शोधण्याचा संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या वतीने सदरील मुलीचा शोध लावण्यात पथकाला यश आले आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सन 2022 मध्ये पोलीस ठाणे मुरुड येथे अल्पवयीन मुलींचा अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आले होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलींचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले, आतापर्यंत मिळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला आदेशित करून सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे ,महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या पथकामार्फत वरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला तसेच सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून विविध ठिकाणी सदर मुलींचा शोध घेऊन ती मुरुड आरणी येथे त्यांच्यासोबत असलेल्या इसमासह मिळून आल्याने त्यांना पोलिस ठाणे मुरुड, येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अमलदार प्रवीण जाधव, योगी, मापोना गिरी,चालक बुढे तसेच सायबर सेल यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.