संतांची शिकवण आपल्या जीवनाला दिशा देते : ना. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले): आपण सर्वांनी जीवन जगत असताना नेहमी आशावादी व प्रयत्नवादी राहिले पाहिजे. आध्यात्मिकतेमुळे आपणास ऊर्जा मिळते, म्हणून आपल्या जीवनाची यशस्वीतेकडे वाटचाल होते. आपण सर्वजन संताच्या विचारावर चालणारे नागरीक आहोत. संतानी दिलेल्या उपदेशाचे पालन आपण दैनंदिन जीवन करत असतो म्हणून तर आपण सर्वजन आपआपल्या पद्धतीने दान धर्म करत असतो, तसे केल्याने पुण्य लाभते. अशी संतांची शिकवण आपणास दिली गेली आहे. माणूस म्हणून आपण सर्वजन एकच आहोत, आपण सर्वजन धार्मिक कार्यक्रमाला महत्व देतो म्हणून आपल्याकडे संतांची प्रवचने होतात. त्या साधुंच्या प्रवचानातुन लोकजागृती होते व संतांच्या शिकवणीमुळेच आपल्या जीवनाला दिशा मिळत असते असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील लोणी येथे श्री गुरु ह.भ.प. ब्रम्हनिष्ठ विठ्ठल महाराज सांडोळकर यांचा सोहळा व आ. स्था. वि.निधीतून ४० लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी सांडोळकर महाराजांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रकाशन ना.बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री.ह.भ.प. गुरूवर्य भास्कर महाराज सांडोळकर, माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उप अभियंता एल.डी. देवकर, गटविकास अधिकारी प्रवीण सरडकर, उद्योजक सुदर्शन मुंडे, चेअरमन लक्ष्मण पटवारी, प्रशांत देवशेट्टे, उपसरपंच वैजनाथ बिरादार , माजी सरपंच राम सुर्यवंशी, विनायक पाटील, सुभाष कावर, रोहिदास मदनुरे, शिवकांत मुळे, नरसिंग कांबळे, नवनाथ वाघमारे, अभिनय शिंदे,आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, मी सर्वसामान्य कार्यकर्ता असुन मी माझ्या राजकीय जीवनात जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यामुळे आपल्या भागाचा विकास झाला. हे केवळ आपल्या आशीर्वादामुळेच शक्य झाले.
मागील काळात उदगीरच्या किल्लाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध दिला. शहरात विविध इमारती व रस्ते, भवन निर्माण केले. तर आपल्या लोणी गावाच्या विकासाठी मूलभूत सुविधा योजना, आमदार फंडातुन सांडोळकर महाराज मठ संस्थानसाठी सभागृह, सार्वजनिक स्मशान भुमी संरक्षण भिंत, मुस्लिम समाज क्रबस्थान संरक्षण भिंत, तांडा वस्ती सुधार योजना, सामाजिक न्याय विभाग, जि.प. दलित वस्ती सुधार योजना, जलजीवन मिशन अंतर्गंत योजना, पाणंद शेतपाणंद रस्ते योजना,लोणी येथे तलाठी भवन, जलजीवन मिशन योजने अंतर्गंत लोणी गावासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी असे एकुण लोणी गावासाठी १३ कोटी ६३ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देवून गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
या प्रसंगी कुलसुम शेख, बाबुराव फड, मारोती भुजबळे, युवराज कावर, माणिक सोलापुरे, जनाबाई मुंडे, उत्तम बिरादार, देविदास केंद्रे, नामदेव चोले, गोविंद फड, बालाजी मुळे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.