सहदेव व्होनाळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरा येथे शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन व उपोषण सुरू
अहमदपूर (गोविंद काळे) : शेतकऱ्यांच्या पिक विमा आग्रीमसह विविध मागण्यासाठी आज गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी कोपरा येथे धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्याचे निवेदन दि ३० आक्टोबर रोजी देऊनही दाद न दिल्याने ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान अहमदपूर तहसील कार्यालय समोर अमरण उपोषण करुनही अद्याप अग्रीम पिक विमा व २०२० पिक विमा अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात पडला नाही तसेच इतर मागणण्यासंदर्भात विचार होत नसल्याने २५ जानेवारी पर्यंत वाट बघुन २६ जानेवारी ला आत्मदहन करणार असे निवेदन देऊनही शासन कसलीही दाद देत नसल्याने १५ जानेवारी २०२४ सोमवार पासून तालुक्यातील प्रत्येक गावात एक दिवशीय ठिया आंदोलन ,उपोषण सुरु आहेत याची सुरुवात सताळा येथुन करण्यात आली. याचाच भाग म्हणून आज गुरुवारी दि १८ जानेवारी रोजी कोपरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३ चा आग्रीम मंजुर कृषीविमा जिल्ह्याधिकारी लातूर यांनी आध्यादेश काढुनही वाटप न करणाऱ्या एस बी आय इंन्सुरंस कंपनीवर कारवाई करुन तीचा परवाना रद्द करावा व शेतकऱ्यांना आग्रीम विमा वाटप करण्यात यावा,२०२०,२०२१,२०२२ चा रब्बी व खरिप विमा शेतकऱ्यांना न देणाऱ्या इंन्सुरंस कंपनीवर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा,यावर्षी पावसाने दडि दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे म्हणून एन डि आर एफ च्या नियमानुसार मदत द्यावी,मा. आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबाच्या अहवालानुसार अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी,सिंचन सुविधा राबवुन तालुक्यातील किंनगाव ,खंडाळी,हाडोळती, अंधोरी मंडळातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत पाणी देण्यात यावे,मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नद्याजोड प्रकल्प राबवुन शेतीसाठी मोफत पाणी व मोफत विधुत देण्यात यावी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मृत्यू झाल्यास वारसांना 10 लाख रुपये मदत द्यावी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणी साठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, खाजगी विमान कंपन्याना कृषी विम्याची परवानगी न देता महाराष्ट्र शासनाने 100 टक्के परतावा देणारी योजना शासकिय स्वतंत्र राबवावी,अहमदपूर तालुक्यात सोयाबीन , दुध यावर प्रक्रिया करणारे शासकीय उद्योग उभे करण्यात यावे,सरसकट शेतकऱ्यांना ५०हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांना उद्योगपती प्रमाणे सरसकट कर्ज माफी देण्यात यावी,आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभ मिळाला नाही त्यांना कर्ज माफी देण्यात यावे,रोजगार हमी योजनेवरील मजुरांचे दोन वेळा काढण्यात येणारे फोटो बंद करा,जी एम बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी.
या मागण्यासाठी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत कोपरा यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी सहदेव व्होनाळे, कमलाकर गायकवाड, महाळकंर आण्णा, परमेश्वर स्वामी, संतोष रेड्डी सह कोपरा येथील शेतकरी किशन भदाडे, सुर्यकांत सुर्यवंशी, शिवाजी हामणे .महादू देपे, ज्ञानोबा बने , प्रभाकर चेचाळे, बाबूराव गोरे शिवराम देपे , मयुर पलमटे, गोविंद गोरे , व्यंकट कासले,जीवन सुर्यवंशी अंगद गोरे, बापूराव तरुडे , गणपती आचार्य,मदन पलमटे , लक्ष्मण भदाडे, विठ्ठल कदम, किशन कासले , शंकर गायकवाड, व्यकटी देपे ,साहेब गोरे, सुभाष पलमटे, सतिश कदम , नाथराव पलमटे,अशोक कासले, भिमाशंकर रोडगे, जनार्धन गोरे, आदि मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात आणि उपोषणात सहभागी होते.