लालबहादूर शास्त्री विद्यालय ‘माणूस’ घडविण्याचे विद्यापीठ.’- ना. संजय बनसोडे.
उदगीर :(एल.पी.उगीले) लालबहादुर शास्त्री शैक्षणिक संकुलात गेल्या ४३ वर्षांपासून सुरू असलेली ‘आंतरशालेय वादविवाद स्पर्धा’ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्तुत्य असून या स्पर्धेतून राष्ट्रासाठी अलौकिक बुद्धिमत्तेचे बालके तयार होतील.” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजयजी बनसोडे यांनी केले. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेली बालके अशा स्पर्धांमधूनच घडत असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात देश सध्या महासत्तेकडे वाटचाल करत आहे. आपणही नरेंद्र मोदी,प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे ,विलासराव देशमुख यासारख्या महान व्यक्तींसारखे वाक्चातुर्य मिळवावे, असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील लालबहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलात आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ऊद्घाटक म्हणून संजय बनसोडे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलूरकर , प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार गोविंदजी केंद्रे तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय सदस्य प्रवीणजी सरदेशमुख, आप्पाराव यादव, संजय गुरव , केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य तथा स्थानिक कार्यवाह शंकरराव लासुणे , संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे , गोळवलकर संकुलाचे स्थानिक अध्यक्ष चंदूशेट रेखावार , मुख्याध्यापक अंबादास गायकवाड उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रवीण सरदेशमुख यांनी वक्तृत्व कौशल्याचे महत्त्व सांगताना पौराणिक कथा सोबतच अब्राहम लिंकन, स्वातंत्र्यवीर सावरकर ,लोकमान्य टिळक व भाई श्यामलालजी यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य अशा स्पर्धांमधूनच विकसित करावे ,असे प्रतिपादन केले.
यावेळी माजी आमदार गोविंदजी केंद्रे यांनी लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते म्हणूनच शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वेगळेपण समाजात ठळक दिसून येते, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ .सुरेंद्र अलूरकर म्हणाले ,”तुम्हाला जीवनात अलौकिक बनायचे असेल तर चांगल्या व्यक्तींचा आदर्श घ्या ,शाळेच्या चांगल्या उपक्रमात सहभागी व्हा. आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शालेय जीवनातील स्पर्धा दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक असतात” तसेच त्यांनी वादविवाद स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य तथा स्थानिक कार्यवाह शंकरराव लासुणे यांनी स्पर्धा संयोजनामागील भूमिका व भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अनेक उपक्रमांची सविस्तर माहिती प्रास्ताविकातून दिली. या स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक म्हणून डॉ.मकरंद गिरी,प्रा.अरूण धायगुडे व प्रा.अरविंद मुळे काम पाहत आहेत. या स्पर्धेत 42 संघांचा सहभाग असून दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
‘भारत छात्र संसद’ च्या 13व्या परिषदेची विजेता विद्यालयाची माजी विद्यार्थींनी प्राजक्ता भांगे,राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून निवड झालेले मुकूंद मिरगे,श्रद्धा पाटील यांचा सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा सहप्रमुख एकनाथ राऊत यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक संजयराव कुलकर्णी यांनी मानले. तसेच स्वागत व परिचय बालाजी पडलवार, वैयक्तिक गीत मुकुंद मिरगे तर शांतिमंत्र मंगेश मुळी यांनी म्हटले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक,कृष्णा मारावार, लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले,स्पर्धा प्रमुख सचिन यतोंडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.