वामन कनाके यांचे दुखद निधन
अहमदपूर : खेरडा तालुका किनवट येथील शेतकरी ज्येष्ठ नागरिक वामन फरीदा कनाके यांचे यांचे दि. 17 रोज बुधवारी दुपारी बारा वाजता अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी राहत्या घरी दुखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 18 रोजी सकाळी बारा वाजता त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात पत्नी , एक मुलगा, दोन मुली, सुन, नातू असा परिवार असून यशवंत विद्यालयातील हिंदी विषयाचे तज्ञ शिक्षक नारायण कनाके यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.