20 जानेवारीच्या मराठ्यांच्या मुंबई वारीची अहमदपूर तालुक्यात जोरदार तयारी
19 तारखेला1000 वाहनांची मोटारसायकल रॅली काढून तालुकाभरात देणार मुंबई वारी चे अवतन
अहमदपूर (गोविंद काळे) : आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनाची अंमलबजावणी नियोजनबद्ध पध्दतीने राबविणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील मराठा समन्वय समितीच्या सदस्यांनी आता मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चा साठी कंबर कसली असून तालुकभरात मोटारसायकल रॅली च्या माध्यमातून “चलो मुबई” चा नारा देण्यात येणार असून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. काल दि 17 जानेवारी ला येथील सकल मराठा समन्वय समिती च्या कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात आला दि.20 तारखेला अंतरवाली सराठी येथून मुंबई मोर्चासाठी निघणाऱ्या वाहनांची व समाज बांधवांची नोंदणी कार्यालयात करण्यात येणार असून प्रत्येक वाहणारा स्टिकर व स्वयंसेवकांसाठी बॅचेस देण्यात येणार असून तालुक्यातील समाज बांधवांनी 19 तारखेच्या रात्रीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले 20 तारखेला दु 12 वाजता अहमदपूर येथून अंतरवाली सराटी येथे वाहने रवाना होतील. तसेच टप्प्याटप्प्याने रवाना होणारे वाहनांची देखील नोंदणी करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले. शासन स्तरावरून होणाऱ्या सर्वेसाठी प्रत्येक गावातून उच्चशिक्षित तरुणांनी याबाबत पुढाकार घेऊन सर्वे बाबत जागरूक रहावे असे आवाहन करण्यात आले. गावागावातून निघणाऱ्या वाहनांमध्ये पाच दिवस पुरेल इतके राशन व उपयोगी साहित्य घेऊनच पुढे निघावे असे आवाहन सकल मराठा समनव्यय समिती अहमदपूर यांच्या वतीने करण्यात आले.