राम दरबाराची खा. सुधाकर श्रृंगारे यांनी केली पाहणी,19 जानेवारी रोजी विधीवत पुजन करून होणार लोकार्पण
अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशभर 22 जानेवारी 2024 रोजी रामलीला उत्सव साजरा होणार असून दिवाळी साजरी होणार असल्याने लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानशूर तथा लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या पुढाकारातून अहमदपूर येथे श्रीरामाच्या दरबाराची प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून 19 जानेवारी रोजी होमहवन करून विधीवत पुजन करून सांयकाळी 7 वा. खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
अहमदपूर शहरातील थोडगा रोडवरील निजवंते नगर मधील भव्य प्रांगणात श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या भव्य दिव्य दोन लाख तिस हजार पणत्यामध्ये प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. सदरील श्रीरामाच्या दरबाराच्या प्रतिकृतीची पाहणी काल सुधाकरराव श्रुगांरे यांनी करून समाधान व्यक्त केले.अहमदपूर सह लातूर जिल्ह्यातील राम भक्तांसाठी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी श्रीरामाचा दरबार भरवून रामभक्तांचा आनंद द्विगुणित केला असून सदरील श्रीरामाच्या दरबाराचे वल्ड रेकार्ड होणार आहे.
खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांचे सुपुत्र शंकर भैय्या श्रृंगारे यांच्या कल्पनेतून दोन एकर जागेत दोन लाख तिस हजार दिव्यांनी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण,सितामाता,हणुमंतरायाचे भव्य दिव्य चित्र उभारण्यात आले असून, आकर्षक रोषणाई, मोठ्या अनेक स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.22 जानेवारी रोजी अयोध्येत होणार असलेल्या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रेक्षपण येथे दाखवण्यात येणार असल्याने प्रत्यक्षात अयोध्या नगरी अहमदपूर शहरात अवतरणार आहे.दि.19 जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता 51 ब्राह्मणांच्या हस्ते विधीवत होमहवन होणार असून सायंकाळी ६ वाजता महिला व मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर लातूर येथील कलाकारांचा श्रीरामा वरती डान्स झाल्यानंतर फित कापुन लोकार्पण होणार असून मोठ्या प्रमाणात अतिशबाजी करण्यात येणार आहे. 20,21,22 जानेवारी 2024 रोजी सर्व रामभक्तानां श्रीरामाचा दरबार पाहता येणार असून 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पाच हजार फुगे आकाशात सोडले जाणार आहेत. तदनंतर हेलीकॉप्टर द्वारे सदरील श्रीरामाच्या दरबारावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
अंतिम टप्प्यात आलेल्या सदरील राम दरबाराची पाहणी खासदार सुधाकरराव श्रुगांरे यांच्या सह
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील, पोलीस उपअधिक्षक मणीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे,नगर परिषदेचे मुख्याधीकारी काकासाहेब डोहीफडे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,जिल्हा चिटणीस हणमंत देवकते, श्रीकांत देशमुख,डॉ. सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी,शहराध्यक्ष सुशांत गुणाले, ओमकार पुणे,संतोष कोटलवार,पिंठू नाईक यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभर श्रीरामाचा आंनद उत्सव साजरा केला जाणार असून अहमदपूर येथे श्रीरामाच्या दरबाराचे आयोजन केले असून याचा सर्व रामभक्तांनी लाभ घेऊन आनंद उत्सव साजरा करण्याचे अहवानही यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुकीचे प्रमुख गणेश दादा हाके पाटील यांनी केले आहे.