नामांतर लढ्यातील ढाण्या वाघ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचे कार्य दीपस्तंभासारखे – बाबासाहेब वाघमारे
अहमदपूर ( गोविंद काळे) : दलित पॅंथर व नामांतर लढ्यामध्ये मराठवाड्यात भाऊसाहेब वाघंबर यांचे कार्य आजच्या आंबेडकरी चळवळीतील पुढाऱ्यांसाठी दीपस्तंभा सारखे असून तत्कालीन काळात समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचारावर ढाण्या वाघाप्रमाणे तुटून पडून, अन्याय अत्याचाराला रोखणे व पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी केले असून त्यांचे हे कार्य आजच्या पिढीला आदर्श घेण्यासारखे असून त्यांचे कार्य हे अतुलनीय होते अशा शब्दात स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे नेते बाबासाहेब वाघमारे यांनी भाऊसाहेबांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
भाऊसाहेब वाघंबर यांच्या अथक संकल्पनेतून महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर, अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी आयोजित मकर संक्रांति, नाम विस्तार दिन व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांना कपडे वाटप व शुभेच्छा कार्यक्रमात ते आपल्या भाषणात बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी भाऊसाहेब वाघंबर म्हणजे आंबेडकरी चळवळीतील चालतं बोलतं विद्यापीठ व नेते, कार्यकर्ते निर्माण करणारा कारखाना होता. त्यांच्या सहवासात राहिलेली अनेक मंडळी आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावारूपाला आली आहेत आणि विविध चळवळीच्या माध्यमातून आपले काम करीत आहेत असे मतं व्यक्त केले.
मकर संक्रांति, नामविस्तार दिन व सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने कपडे वाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते बाबासाहेब कांबळे हे होते तर उद्घघाटक म्हणून आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलचे संपादक शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई कांबळे, प्रा. बालाजी आचार्य , शेषेराव ससाणे, माजी नगरसेविका शाहूबाई कांबळे, एस. ए. जाधव, पत्रकार भीमराव कांबळे, गणेश मुंडे, पो. काॅ. बिरादार साहेब व शेटकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदपूर तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या गोरगरीब महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये प्रेम स्नेह निर्माण व्हावा आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी या उद्देशाने भाऊसाहेब वाघंबर यांनी महिलांना आपल्या बहिणीसारखे आपल्या घरी आणून त्यांना चोळी वाटप करण्याची ही परंपरा कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी 1988 साली सुरुवात केली ती 1999 पर्यंत चोळी वाटपाच्या माध्यमातून सुरू होती पूढे सन 2000 पासून भाऊसाहेब वाघंबर यांनी त्यात भर टाकून साडीचोळी वाटपाची सुरुवात केली. भाऊसाहेब वाघंबर यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र रिपाईचे नेते अरुणभाऊ वाघंबर व त्यांच्या सुनबाई अंजली वाघंबर यांनी त्यांची ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवली असून या कार्यक्रमा दरम्यान यावेळी 480 महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले. आणि भोजनदान मोठ्या प्रमाणात देण्यात आले.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे सत्कार वाघंबर परिवाराच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक तथा निमंत्रक रिपाईचे नेते अरुणभाऊ वाघंबर यांनी केले तर उपस्थितांचे आभार धम्म कार्यामध्ये अग्रणी असणाऱ्या अंजली वाघंबर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य वाघंबर, रितेश वाघंबर, शेख कलीम, संजय वाघंबर, शुभम वाघंबर, आकाश व्यवहारे, अश्विनी वाघंबर, दैवशाला वाघंबर, विकास व्यवहारे, आतिक कुरेशी, सचिन गायकवाड, अनिल वाघमारे, डॉन वाघमारे, लामतुरे,आदीं कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी श्रीरंग गायकवाड आणि मंगलबाई सोनकांबळे यांच्या भीम बुद्ध गीताचा कार्यक्रम रात्रभर चालला यावेळी बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.