विद्यापीठ नामांतर लढा भिमसैनिकांचे स्फूलींग चेतविणारा – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा हा स्वाभिमानाचा,अस्मितेचा लढा होता या लढ्यात भिमसैनिकांनी दाखवलेले धैर्य आणी प्रसंगी जीवाचे बलीदान देवून दिलेला निकराचा लढा हा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा असून अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणाऱ्यांसाठी हा लढा स्फूलींग चेतविणारा ठरला आहे असे प्रतिपादन युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
शहरातील शहिद गौतम वाघमारे चौक येथे विद्यापीठ नामविस्तार दिन व अभिवादन कार्यक्रमात ते अध्यक्षपदा वरून बोलत होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे, पत्रकार शिवाजीराव गायकवाड,भिमराव कांबळे,सय्यद अनवर, सय्यद मूज्जमील, आसीफखान पठाण, बालाजी कांबळे,गणेशराव मूंडे,राजू पाटील,हरिभाऊ गूट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला धम्म ध्वजारोहन सरस्वतीबाई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सामूहिक त्री शरण पंचशिलाचे पठण करण्यात आले.
पुढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,तब्बल सोळा वर्षाचा निकराचा लढा भिमसैनिकांनी देवून प्रसंगी जीवाचे बलीदान दिले तेंव्हा कूठे विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचा नांव देण्यात आले.सिम्बाॅल ऑफ नाॅलेज म्हणून गौरवीत व्यक्तीचे नांव विद्यापीठाला देण्यासाठी केवळ जातीचा अडसर होता हे वारंवार सिध्द झाले.यातून प्रस्थापितांची जातीय मानसिकता दिसून येते.पण आज देशभरात चार पाच डझन विद्यापीठ आणी संस्थांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव आहे.बाबासाहेबांच्या नावामूळे विद्यापीठांचा आणी संस्थांचा गौरव वाढला आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांनी केले.तर आभार सूमीत बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी बनसोडे,सचिन बानाटे, संविधान कदम,अभय गायकवाड,जय गूळवे, रोहिदास तिगोटे, सतीश कदम,सूरेश कांबळे,अनिल तिगोटे,कोमेश सोनकांबळे, दिलीप सोनकांबळे,आकाश वाघमारे,बापू वाघमारे, सूनिल ससाणे आदींनी पुढाकार घेतला.