देवणी नगरपंचातीला घंटा गाडी चालक सुनील सूर्यवंशी यांनी दिले निवेदन

0
देवणी नगरपंचातीला घंटा गाडी चालक सुनील सूर्यवंशी यांनी दिले निवेदन

देवणी नगरपंचातीला घंटा गाडी चालक सुनील सूर्यवंशी यांनी दिले निवेदन

२३ जानेवारीपासून बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा.

देवणी (प्रतिनिधी) : देवणी नगर पंचायत अंतर्गत स्वामी एन्टरप्राजेस या एजन्सीकडे घंटा गाडी चालक सुनील सूर्यवंशी गेल्या दोन वर्षापासून घनकचरा व्यवस्थापनात घंटागाडीवर चालक या पदावर काम केलेला असून त्याला देवणी नगरपंचत प्रशासन व स्वामी एंटरप्रायजेस यांनी कुठलीही लेखी सूचना न देता कामावरून कमी केल्याबद्दल देवणी नगरपंचायतीला दि.१८ गुरुवार रोजी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की घंटागाडी चालक सुनील माधवराव सूर्यवंशी रा.देवणी देवणी नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनात गेल्या दोन वर्षांपासून घंटागाडीवर चालक या पदावर सेवा केलेली आहे. घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी याला दर महा 6000/- रु. प्रमाणे वेतन देवून त्याच्याकडून सेवा करून घेतली आहे. या वेनातून त्याचा पीएफ कपात केलेला नाही अथवा कपात केलेली माहिती त्याला दिलेली नाही.त्याला कुठलेही पुर्वसुचना न देता तू आता घरला जा गाडीची चावी आमच्याकडे जमा कर असे म्हणून त्याला घंटागाडी चालक या कामावरून कमी केलेले आहे. यामुळे घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी मे. साहेबांना विनंती केली आहे की सदर निवेदनाची काळजीपूर्वक चौकशी करून घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी याला पूर्वरत कामावर घेण्याची कार्यवाही करावी अन्यथा दि.२३ जानेवारी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.अशी माहिती निवेदनात लिहिलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *