आ.रमेशआप्पा कराड, खा.शृंगारे यांच्याकडून रेणापूरातील श्री रेणुका देवी मंदिरात स्वच्छता

0
आ.रमेशआप्पा कराड, खा.शृंगारे यांच्याकडून रेणापूरातील श्री रेणुका देवी मंदिरात स्वच्छता

आ.रमेशआप्पा कराड, खा.शृंगारे यांच्याकडून रेणापूरातील श्री रेणुका देवी मंदिरात स्वच्छता

लातूर (प्रतिनिधी) : देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड आणि खा. सुधाकर शृंगारे यांनी १९ जानेवारी शुक्रवार रोजी रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुका देवी मंदिराची स्वच्छता केली यावेळी भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
आयोध्या नगरीत प्रदीर्घ संघर्षानंतर बांधण्यात येत असलेल्या भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी राम लल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील मंदिरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवावी अशी संकल्पना पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मांडली त्यानुसार भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड आणि खा. सुधाकर शृंगारे यांनी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती श्री रेणुका देवी मंदिर येथे शुक्रवारी सकाळी मंदिराचा गाभारा, सभामंडप पाण्याने स्वच्छ धुण्यात आला आणि परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.

    रेणुका देवी मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रमात भाजपाचे विक्रमकाका शिंदे, अॅड. दशरथ सरवदे, वसंत करमुडे, अभिषेक आकनगिरे, सतीश आंबेकर, नवनाथ भोसले, सुकेश भंडारे, डॉ. बाबासाहेब घुले, भागवत गीते, श्रीकृष्ण मोटेगावकर, चंद्रकांत कातळे, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, उत्तम चव्हाण, श्रीकृष्ण पवार, शीला आचार्य, अनुसया फड, गणेश माळेगावकर, राजू अत्तार, शेख अजीम, उज्वल कांबळे, रमाकांत चव्हाण, मारुती गालफाडे, गणेश चव्हाण, रोहित खुमशे, नागेश बसतापुरे, श्रीमंत नागरगोजे, धम्मानंद घोडके, सचिन शिरसकर, नंदू बंडे, रफिक शिकलकर, हुसेन पठाण, दत्ता उगिले, दिलीप चव्हाण, हनुमंत भालेराव, अंतराम चव्हाण, बाबुराव कस्तुरे, पप्पू कुडके, अजय मरलापल्ले, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्वप्रथम आ. कराड आणि खा. शृंगारे यांनी श्री रेणुका मातेची आरती करून दर्शन घेतले. स्वच्छता कार्यानंतर रेणुका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष राम पाटील, गुरसिध्दअप्पा उटगे, दिलीप आकनगिरे यांनी रेणुका मातेची प्रतिमा भेट देऊन यथोचित सत्कार केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *