अहमदपूर येथे उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढला विविध 22 कार्यालयालय प्रमुखांना मुख्यालयी राहण्याचा आदेश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील जनता ही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात राहत नसल्याने त्रस्त झाली असून तात्काळ यावर कार्यवाही करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी उपजिल्हाधिकारी फुलारी यांच्याकडे केली होती याची नोंद घेत उपजिल्हाधिकारी यांनी अहमदपूर येथील विविध 22 कार्यालयाना मुख्यालयी राहण्याविषयी आदेश काढला आहे.अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणले जाईल असा सज्जड इशाराही त्यांनी आदेशात दिला आहे.[मुख्यालयी राहण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश जर अधिकाऱ्यांनी पाळला नाही तर अश्या अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासून महाराष्ट्र भर नामुष्की करू व राजकारणाचा अहमदपूर प्याटर्न असा निर्माण करू की येथे रुजू झालेला प्रत्येक अधिकारी मुख्यालयी राहण्याच्या तयारीनेच आला पाहिजे असा सज्जड इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी दिला आहे.अधिकारी कर्मचारी शासनाकडून करोडो रुपये घरभाडे उचलून जर वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसतील व जनतेला भेटत नसतील तर जनतेची ही हेळसांड आहे व याला एकमेव कारण यांचे लातूरला राहणे आहे.ते सर्व जर अहमदपूर मध्ये राहिले तर बरोबर कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयात राहतील.तसेही आता या शासकीय नौकरदारांसाठी आठवडा फक्त पाच दिवसांचा आहे,एवढा वेळ तरी मुख्यालयी राहा व उचलत असलेल्या पगाराची जाण ठेवा असे डॉ भिकाणे संतप्त पणे म्हणाले.]अहमदपूर येथील सर्वसामान्य जनता रोज कार्यालयांमध्ये खेटे घालून उद्विग्न होत असल्यामुळे ती कमालीची संतप्त झाली असल्याचे चित्र अनेक कार्यालयाना भेटी दिल्यावर जाणवत आहे.