आरोग्य विभाग लातूर व शिक्षण विभाग अहमदपूर च्या वतीने “तंबाखूमुक्त शाळा अभियान” अंतर्गत तालुस्तरीय कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व शिक्षण विभाग अहमदपूर यांच्या वतीने तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत अहमदपूर तालुक्यातील डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रतिष्ठानचे अध्यापक महा विद्यालय अहमदपूर येथे कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी मा.नमन गोयल साहेब(भा. प्र. से.) तहसीलदार अहमदपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष,डॉ. प्रदीप ढेले जिल्हा शल्य चिकित्सक लातूर, गटशिक्षण आधिकारी बबनराव ढोकाडे, प्राचार्य दिलीप मुगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिवाजी सुरजमल, वरील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यशाळेत अहमदपूर तालुक्यातील 310 शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक/ मुख्याध्यापीका ,शिक्षक उपस्थित होते.
जागतिक कर्करोग दिन दि 04 फेब्रुवारी 2024 पर्यंत अहमदपूर तालुक्यातील सर्व शाळा राज्य शासनाच्या निकषा प्रमाणे तंबाखूमुक्त शाळा करण्याचे कार्यशाळेत मा.नमन गोयल साहेब (भा. प्र. से.) तहसीलदार अहमदपूर यांनी कार्यशाळा प्रसंगी आवाहन केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी असे मार्गदर्शन केले की अहमदपूर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करून विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवण्यात यावे.व आपली शैक्षणिक संस्था कायम तंबाखूमुक्त ठेवावे असे मार्गदर्शन केले व गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकडे यांनी तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करू असे आश्वासन दिले.
कार्यशाळेत तंबाखू मुक्त शाळा विषयीचे निकष ,प्रचार, प्रसिद्धी साहित्य व तंबाखू मुक्त शाळा सूचना फलक इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले. व तंबाखू मुक्त शाळा करणे करिता उपस्थित सर्व मुख्याध्यापक यांना डाँ माधुरी उतीकर यांनी पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.सलाम मुबंई फाऊंडेशनचे तालुका समन्वयक महादेव खळुरे यांनी अँप कसे डाऊनलोड करावे व 9 निकष कशा पद्धतीने अपलोड करावे याबाबत माहिती दिली
सदर कार्यशाळेत आरोग्य विभागातील विविध अधिकारी कर्मचारी यांनी मौखिक आरोग्य, मानसिक आरोग्य व HIV एड्स बाबत या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेसाठी खालील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यशाळेत विशेष परिश्रम घेण्यात आले.डॉ.भाग्योदय बरेवार,प्रकाश बेंम्बरे,स्वामी गणेश, अनिल वाठोरे, श्रीमती संध्या शेडोळे, दीपक पवार, स्वामी कैलास,कृष्णा राठोड तसेच गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती कामाक्षी पवार,सोमनाथ केंद्रे,मनिषा गुणाले,इंदुमती जोगदंड,14 केंद्राचे सर्व केंद्रप्रमुख व 310 शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.
यावेळी सूत्रसंचालन कुंभारे अण्णाराव यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.माधुरी उतीकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल वाठोरे यांनी मानले.