श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर दिले निवेदन
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्याकडे देवणी तालुक्यातील श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विविध मागण्याची निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने १ देवणी तालुक्यातील गावठाण नावे करणे, २ मातंग समाजातील स्मशानभूमीचे ग्रामपंचायत कार्यालयात नोंद घेणे, ३ तलाठी भरती रद्द करणे, ४ देवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य यांचे थकित मानधन त्वरित मिळणे,प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले, देवणी तालुक्यात ४६ ग्रामपंचायती असुन काही ठिकाणी गावठाण, वनविभागाची जागा असुन शासनाने आजतागायत त्या ठिकाणी वास्तव्य करून त्यां जागेवर गोरगरीब कुटुंब बसले आहेत गाव वाडी तांडे आहेत आज पर्यंत मातंग समाज वास्तव्य आहे परंतु मयत व्यक्ती जाळण्यासाठी जागा नाही जागा असेल तर नावे करून द्यावे,तसेच तलाठीच्या परिक्षेत गैरप्रकार घडले आहे म्हणून तलाठी भरती रद्द करण्यात यावे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक क्राती संघटनेचे मारुती गुंडीले, उपेक्षितांचे नेते वसंतराव बिबिनवरे टाकळीकर, डि, एन,कांबळे,यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले तसेच निवेदनावर स्वाक्षरी लक्ष्मण रणदिवे मराठवाडा प्रमुख, गजानन गायकवाड जिल्हाध्यक्ष लातूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,