समर्थ विद्यालयात आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबीर.
उदगीर (प्रतिनिधी): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन शिबीर शिबीर घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदगीर येथील महेश अर्बन बँकचे शाखा व्यवस्थापक प्रदीप उगीले, ग्यान मित्रम् करियर अकॅडमी, मुंबईचे व्यवस्थापक प्रा. प्रफुल सोनने, प्रा. राजकुमार चव्हाण, पर्यावरण सिद्धार्थ बोडके, प्रा. बी. एस. बाबळसूरे आदींची उपस्थिती होती. यावेळी उगीले यानी आर्थिक साक्षरता या विषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तर चव्हाण यांनी १० वी १२ वी नंतर करियर व स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी विद्यार्थी जीवनात बचतीची सवय लागावी म्हणून शाळेत चालू असलेल्या समर्थ विद्यार्थी बचत बँकेची माहिती देऊन बचत करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. के. डी. मुडपे यांनी केले. सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी तर आभार अमर जाधव यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.