प्रा. डॉ. नरसिंग कदम यांचा उदयगिरी लाईन्स नेत्रालय कडून सत्कार

0
प्रा. डॉ. नरसिंग कदम यांचा उदयगिरी लाईन्स नेत्रालय कडून सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीर जिल्हा लातूरच्या वतीने साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. नरसिंग कदम यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उदयगिरी लायन्स नेत्रालयाचे अध्यक्ष डॉ.लखोटिया रामप्रसाद, कोषाध्यक्ष अजय मलगे, पत्रकार अंबादास अलमखाने यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. प्रा कदम यांनी सामाजिक क्षेत्रातील विविध समाज उपयोगी उपक्रम राबवलेले आहेत तसेच नेत्र रुग्णालयाच्या एका शिबिराचे आयोजन केलेले आहे व अनेक लोकांना नेत्र तपासणी आणि नेत्राच्या शस्त्रक्रियेसाठी प्रेरित केलेले आहे. उदय गिरी लॉन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी या समारंभाचे आयोजन केलेले होते. मानवतेच्या जाणिवेने अंधत्व निवारण कार्यामध्ये तसेच अनेकांच्या आयुष्यात दृष्टी देण्याचे ,प्रकाशमय करण्याचे कार्य उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय करत असते. सत्काराला उत्तर देत असताना डॉ कदम म्हणाले मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत परंतु धर्मादाय नेत्र रुग्णालय यांचे कार्य खूप महान आहे ते कार्य पाहता पाहता मला असे वाटते माझा सर्वात मोठा सन्मान हाच आहे . मी आयुष्यभर मला जेवढे सामाजिक कार्य करता येईल तेवढे करत राहील असेही याप्रसंगी ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामप्रसाद लखोटिया यांनी तर सूत्रसंचालन व आभार गणेश मुंडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *