तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरनाऱ्या आरोपीला 24 तासात 100 % मुद्देमालासह अटक.
लातूर (एल.पी.उगीले) : अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक करून त्यांच्याकडून शंभर टक्के मुद्द्यामाल जप्त केला आहे. याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे अहमदपूर हद्दी मध्ये 22/01/2024 ते 23/01/2024 मध्यरात्री तळेगाव येथील तुळजावानी मंदिराची दान पेटी फोडून रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरीची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 51/2024 कलम 457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर मनीष कल्याणकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकाने केलेल्या परिश्रमामुळे गुप्त बातमी दाराकडून मंदिरची दानपेटी व देवीचे दागिने चोरणाऱ्या करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून दानपेटी तोडून रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने चोरी करणारे आरोपीला निष्पन्न करून त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपी नामेविकास अनिरुद्ध डावरे, (वय 30 वर्ष,राहणार साठे नगर, अहमदपूर) याला दिनांक 23/01/2024 रोजी त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांने त्याच्या आणखीन एक साथीदारासह सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. नमुद गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल दागिने व रोख रक्कम एकूण 52 हजार रुपयाचा मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपीला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. नमूद आरोपीने पोलीस ठाणे चाकूर हद्दीत केलेले घरफोडीचे 2 गुन्हे कबूल केले असून त्याचे कडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर हे करीत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या मंदिराची दानपेटी फोडून व देवीच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा चोरलेला मुद्देमाल 100% हस्तगत केला आहे. अहमदपूर पोलिसांनी सदर गुन्हा 24 तासात उघडकीस आणला आहे. तसेच पोलीस ठाणे चाकूर चे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर मनीष कल्याणकर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आंदोरीकर, पोलीस अमलदार तानाजी आरदवाड, बापू धुळगुंडे, राजकुमार शिंदे, रुपेश कजेवाड, पाराजी पुठेवाड, यांनी केली आहे.