स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 02 मोटरसायकल जप्त. 01आरोपी अटक

0
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 02 मोटरसायकल जप्त. 01आरोपी अटक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलच्या संदर्भात तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्कृष्ट कामगिरी करून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकली जप्त करून आरोपीला अटक केली आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 24/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी मार्केट यार्ड शिवनेरी गेट परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 24/01/2024 रोजी सदर पथक तात्काळ मार्केट यार्ड परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव करणवीर महावीरसिंग चव्हाण, (वय 30 वर्ष, राहणार मंठाळे नगर, लातूर).असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटर सायकल काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालय लातूर येथून चोरी केलेली आहे. तसेच गूळ मार्केट,लातूर येथून आणखीन एक मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्यांने शिवाजीनगर व गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या 2 मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 70 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शिवाजीनगर व गांधी चौक पोलीस ठाणे मधील मोटरसायकल चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आलेला आहे. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपीला पोलीस ठाणे शिवाजीनगर च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, तुराब पठाण, जमीर शेख, राजाभाऊ मस्के, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *