आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
देवणी (प्रतिनिधी) : जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी द्वारा संचलित आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे 75 वे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे अध्यक्ष मा श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब तर प्रमूख पाहूणे म्हणून रहीम खुरेशि, देविदास पतंगे, डॉ संतोष बिरादार,अमरदीप बोरे, जावेद येरोळे, प्रवीण बेळे, कै.रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे,उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, शाळेचे प्राचार्य राहूल बालूरे, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यांनतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य राहुल बालूरे यांनी सादर केले व त्याचबरोबर अमरदिप बोरे यांनी शाळेतील शिस्तीचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ शिवाजी सोनटक्के यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी नवीन संकल्पना घेवून प्रजासत्ताक दिन साजरी करण्यात आले.यात विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य, कराटे प्रात्यक्षिकांचे सादरिकरण करून मान्यवरांची मने जिंकली.यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत विवीध क्रीडास्पर्धा व उपक्रम घेण्यात आले होते त्यात प्रावीण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आले व तसेच किक बॉक्सिंग,कराटे या खेळात यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था सचिव मा श्री गजाननजी भोपणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य राहुल बालूरे, उपप्राचार्य रामदास नागराळे, व्यवस्थापक सुप्रिया कांबळे, लीड को ऑर्डीनेटर क्षेमानंद कन्नाडे, वस्तीगृह अधीक्षक मंजुनाथ कन्नाडे, विजयकुमार भोजने व तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी कै. रसिका महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी रणजीत गायकवाड यांनी भारतीय उद्देशिकेचे वाचन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामदास नागराळे यांनी केले तर आभार उमेश अंबेनगरे यांनी मानले.