‘पर्दाफाश” नाटकाने रसिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
सोशल मीडियाच्या नाटकातून पालकांची कान उघाडनी.
चाकूर (गोविंद काळे) : अंधश्रद्धेच्या नावाखाली भोळ्या बाबड्या जनतेची लूट करणाऱ्या कालीचरण मातेचा पत्रकारानी पर्दाफाश करून रसिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.सोशल मीडियाने विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याने पालकांची कान उघाडणी ही करण्यात आली.
सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न झाले. उद्घाटन मा.राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गिरीधरराव कणसे पाटील तर प्रमुख अतिथी सरपंच सुरेखाताई दयानंदराव सुरवसे माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंदराव सुरवसे उपसरपंच सय्यद हैदर, राकपाचे ता.अध्यक्ष राहुल सुरवसे,गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
प्रा.मारोती बुद्रुक पाटील लिखित व दिग्दर्शित ‘पर्दाफाश” नाटकाला रसिकांनी डोक्यात घेतले. या नाटकाला सह दिग्दर्शन विनय नकाते व बालाजी सोमवंशी यांनी केले.
कालीचरण मातेच्या अंधश्रद्धेमुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याने पत्रकाराने या बातमीचा छडा लावून कालीचरणमातेला अटक करून कुटुंबाला न्याय मिळवून दिला. लॉकडाऊन पासून सोशल मीडियाने घराघरात धुमाकूळ घातला असून गुगल, व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर,इंस्टाग्राम यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर घेऊन त्याचा परिणाम कसा झाला याबद्दल पालकांची कान उघडणी करण्यात आली.
राजकन्या वाघमारे व वैष्णवी शिंदे यांचे रसिकांनी कौतुक केले.चाटे जान्हवी,सृष्टी सुरवसे,सिमरन शेख, दिपाली पाटील,सिमरन सय्यद, साक्षी वाघमारे, दिव्या मुर्के,मुस्कान शेख, प्रणिता सुरवसे,महिन पठान,यांनी आपापल्या भूमिकेतून योग्य पात्र वटविले सोशल मीडिया या नाटकात ,नंदनी खंदारे आयशा पठाण, श्रद्धा मुदाळे,अनुष्का पाटील, मारिया खायमी,सायली शिंदे,रोहिणी सोनकांबळे, राधा हनुमंते,समीक्षा पाटील यांनी सोशल मीडियातील भूमिका सुंदर वटवल्याने रसिकांनी कौतुक केले .
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मानवी मनोरे,लेझीम, पथक,कवायत प्रकार प्रा. दयानंद झांबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा.वैजनाथ सुरनर,सहशिक्षक व्यंकट सिंदगे जावेद शेख,सुरज हनुमंत तावरे,भालचंद्र डांगे,मुराद शेख यांनीही यशस्वी प्रयत्न केले.