रोटरी क्लब व खडके क्रिटिकल केअर च्या वतीने सहाशे रुग्णांची निशुल्क तपासणी व उपचार
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथे प्रजासत्ताक दिनी खडके क्रिटिकल केअर व रोटरी क्लब अहमदपूर यांच्या वतीने तालुका आणि परिसरातील सहाशे रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात आली व उपचारही करण्यात आले या या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घघाटन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई हाके, बाजीराव खडके, शिवाजी खांडेकर, हाणमंत देवकते रोटरीचे अध्यक्ष शिवशंकर पाटील सचिव श्रीराम कलमे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर अतुल खडके यांनी केले , सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी तर आभार मंदाकिनी खडके यांनी मानले.
यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी या शिबिराबद्दल गौरव उद्गगार काढले. गणेश दादा हाके पाटील यांनी डॉक्टर अतुल खडके व रोटरी क्लब यांचे सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन केले.
शिबिरासाठी डॉक्टर अतुल खडके व डॉक्टर सुप्रिया खडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासण्या व उपायोजना करण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिन व
खडके क्रिटिकल केअर चे वर्धापन दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब अहमदपूरच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, शुगर तपासणी ,फुपुस तपासणी, रक्तदाब, कॅल्शियम तपासणी, थायरॉईड तपासणी या सर्व तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधे व गोळ्या व उपचार देण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले यामध्ये 25 जणांनी रक्तदान केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी खडके क्रिटिकल केअरचा सर्व स्टाफ रोटरी क्लब सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.