संत तुकाराम पुरस्काराचे मानकरी प्रा.सुरेश गर्जे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोपप्रसंगी संत तुकाराम स्मृती पुरस्कार प्रा.सुरेश गर्जे यांना देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्था सहसचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया होते, प्रमुख पाहुणे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.मा.मा.जाधव होते. मंचावर संस्था सदस्य प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, विभाग प्रमुख प्रा. डॉ.दीपक चिद्दरवार, प्रा.डॉ.बी.आर. दहिफळे, पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे, प्रा.डॉ.के.एस.भदाडे यांची उपस्थिती होती. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रा.गर्जे व सौ.गर्जे यांना वितरित करण्यात आले. मराठी पंधरवड्या निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील अरुणा हाके, शुर्तीकवठाळे, विकास डांगे, स्नेहा नामवाड, अवंतिका गायकवाड, वक्तृत्व स्पर्धेतील प्रणाली कांबळे, अरुणा हाके, मुक्तासूळ, स्नेहा नामवाड, आनंद मळगे, प्रेम पत्र लेखन स्पर्धेत अरुणा हाके, श्रुती यमलवार, संध्या जमादार, अश्विनी गायकवाड, शुभम यादव, उदगीरी बोलीभाषेतील शब्द संकलन स्पर्धेत अभय भांगे, रूपाली लोणीकर, अश्विनी गायकवाड, अरुण हाके, संध्या जमादार यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी डॉ.मा.मा.जाधव म्हणाले मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी नवनवे सर्जनशील लेखक घडले पाहिजेत. संत तुकारामाचे अभंग जगण्याचा मार्ग दाखवून नवीन ऊर्जा देतात भाषा हे सांस्कृतिक आयुध आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. समारोपात डॉ.लखोटिया म्हणाले मराठी भाषेसाठी वाचन, लेखन व्यवहार वाढला पाहिजे. संत तुकाराम अध्यासनसाठी संस्था सदैव विभागाच्या पाठीशी राहील. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.ए.पी.मोरे यांनी केले तर आभार अभय भांगे यांनी मानले.