उदगीर येथे जन आक्रोश मोर्चा

0
उदगीर येथे जन आक्रोश मोर्चा

उदगीर (एल.पी.उगीले) : वलांडी येथे ६ वर्षाच्या मुलीवर २२ वर्षाच्या नराधमाने अमानुष बलात्कार केला तसेच होनाळी येथील सामुहिक आत्याचार, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,या दोन्ही घटना समस्त माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आहेत,या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे, व पीडितांना न्याय देऊन सर्व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आक्रोश मोर्चा चे आयोजन शिवसेना,हिंदू खाटीक,विविध हिंदू संघटनेच्या वतीने उदगीर शहरात ३१/१/२४ रोजी,बुधवार, ठीक सकाळी ११.०० वाजता शंकरप्पा मठा पासून सुरुवात झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत महामोर्चा निघाला, यावेळी जयंत काथवटे हिंदू खाटीक संघटना,भानुदास साबणे,आनंद साबणे,व्येंकट साबणे,श्याम साबणे,सचिन साबणे,चंद्रकांत टेंगेटोल शिवसेना तालुकाप्रमुख,संजय राठोड मनसे जिल्हाध्यक्ष,अनिल पंचाक्षरी शहरप्रमुख, आशिष पाटील राजूरकर,विष्णु चिंतलवार,निलेश विभूते,तातेराव मुंडे,सतीश पाटील, विलास खिंडे,मनोज पदाले,अजय नवरखेले,विशाल गोटमुकले,अहमद सरवर,शेख फयाज,मौलाना अजीज, मोमीन नजीब,अमन पटेल,बालाजी कारामुंगे,राहुल कांबळे,उत्तरा कलबुर्गे, शिला इंगळे, अरुणताई लेंडाणे,शंकर घोने,रवी टोम्पे,बंडू कांबळे,अनिल सदांनंदे,राजू सदांनदे, संजय टोम्पे,जगनाथ कांबळे,विलास कवठाळे,विलास खडके,केशव खडके,बालाजी मांजरे,सतीश पलंगे, शिवाजी मोरीकर,बालाजी डोंगरे,मनोज सदांनदे,गणेश गायकवाड,सावन पास्तापुरे,अभिजित पाटील आणि उदगीर शहरातील सर्व समाजातील सुजाण नागरिक,शिवप्रेमी, शिवसैनिक,महिला व युवक बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *