उदगीर शहरातील कुटूंबाचे आरक्षण सर्वेक्षण राहिले असल्यास नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा” – मुख्याधिकारी सुंदर बोंदर
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण कामकाज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनानुसार उदगीर शहरात दिनांक २३ ते ३१ जानेवारी दरम्यान करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी प्रगणक, पर्यवेक्षक, अधिकारी कर्मचारी यांचे भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे प्रशिक्षण घेवून त्यांना सर्वेक्षण कामकाज करण्याची कार्यप्रणाली समजावली.
सदर उदगीर शहर सर्वेक्षण मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी सुंदर बोंदर, नियंत्रण अधिकारी सतीश बिलापट्टे, विरेंद्र उळागड्डे, समन्वय अधिकारी वैजिनाथ बदनाळे यांच्या सह २६ पर्यवेक्षक, ३८९ प्रगनक, यांची नियुक्ती करण्यात आली होती. उदगीर नगरपरिषद हद्दीतील ३३ वार्ड मधील एकूण १८८१९ सर्व प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झालेला असून नजर चुकीने जर कोणाच्या कुटुंबाचे सर्वेक्षण राहिले असल्यास त्यांनी दिनांक २ फेब्रुवारी २०२४ पूर्वी उदगीर नगरपरिषद कार्यालयासी संपर्क साधावा. असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.