शिक्षकांनी सेवानिवृत्तीच्या नंतर सामाजिक कार्यात झोकून द्यावे शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानसन्मान दिला जातो त्यामुळे शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा काळ सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांनी केले. ते यशवंत तांत्रिक विद्यालयाचे निदेशक विश्वनाथ पगलडे यांच्या 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना शाळेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भर आहेर देऊन सेवा गौरव कृती सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून दि. 31 रोजी संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार खंदाडे, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर , माजी सभापती एडवोकेट भारत चामे,माजी सभापती सौ आयोध्याताई केंद्रे, माजी उपसभापती बापूराव होनराव पाटील, भाजपा ओबीसी प्रदेशाचे सचिव ज्ञानोबा बडगिरे, शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार गोटे ,पर्यवेक्षक अशोक पेद्येवाढ, राम तत्तापूरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माजी आमदार बबन खंदाडे म्हणाले की शिक्षणाला अध्यात्माची जोड दिल्यानंतर एक संस्कार पिढी निर्माण होत असल्याचे सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त बद्दल निदेशक विश्वनाथ पगडले सौ कविता पगलडे यांचा शाल, श्रीफळ आणि भर आहेर देऊन शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी व माजी आ. बब्रुवाहन खंदाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी यावेळी अरूण मोरे,प्रा अनिल चवळे यांचे मनोगत पर भाषणे झाली,या समयी संस्थेचे डॉक्टर अशोक सांगवीकर ,भाजपाचे ज्ञानोबा बडगिरे,माजी उपसभापती कमलाकर पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे, माजी सभापती एडवोकेट भारत चामे यांचे शुभेच्छा पर भाषणे झाली.
सत्कारमूर्ती विश्वनाथ पगडले यांचे मनोगत पर भाषण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार डॉक्टर शरद करकनाळे यांनी तर आभार अजित लंजीले यांनी मांनले.