गणित प्रज्ञा परीक्षेसाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 14 विद्यार्थी पात्र
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या 14 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत यश संपादन केले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई तरडे हाके तर प्रमुख अतिथी म्हणून गणित अध्यापक मंडळाचे जिल्हा सदस्य तथा गणित तज्ञ विजयकुमार किलचे,सदस्य शिवानंद उंदीरकल्ले,सदस्य जिलानी शेख, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तौर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अत्यंत कठीण असलेल्या या परीक्षेस पाचवी चे एकूण 30 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थी 11 फेब्रुवारी रोजी लातूर येथे होणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यात तेजल हरिहर सोनवणे ,आराध्या उमाकांत लांडगे, अनुष्का बाबुराव नेळगे, मयूर ज्ञानेश्वर उपलवाड, आराध्या अविनाश राठोड, संकर्षण गोपाळ पलमटे ,आनंदी मनोज कदम, यशस्वी देवानंद सूर्यवंशी ,प्रसाद सतीश बैकरे ,अमृता जयपद्मम वजीर, श्रेयश अमोल देशमुख, ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी, जान्हवी दत्तात्रय डांगे ,आर्या भानुदास दुधाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते पालकांसह सत्कार करण्यात आला.
गणित तज्ञ शिवानंद उंदीरकल्ले व विजय कुमार किलचे यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. उपस्थित पालकांच्या वतीने गोपाळ पलमटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य रेखाताई हाके यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राजक्ता भोसले, सविता पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा मानसीताई हाके सह पालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार प्राजक्ता भोसले यांनी मानले.