डॉ. बासिदखान पठाण यांना राज्यस्तरीय शोधवार्ता उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : रंगकर्मी साहित्य, कला,क्रिडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघ उदगीर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शोधवार्ता उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार २०२३ अहमदपूर चे पत्रकार ज्यांना अहमदपूर करांनी दबंग पत्रकार असे नामांकित केले असुन पत्रकार डॉ. बासिदखान पठाण यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २८ जानेवारी रोजी उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात योजित ८ वे लघुचित्रपट महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले संत श्रेष्ठ पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मीनी मंदीर कमीटीचे अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संत श्रेष्ठ ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते डॉ. बासिदखान पठाण यांना उत्कृष्ट शोधवार्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कायक्रमाण महाराष्ट्र भरातुन परकार व विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.या वेळी सर्वप्रथम नटराजांच्या मुर्तीचे पुजन करून तुळशीला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उदगीर भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज पुदाले, उपस्थित होते.तर उद्घाटक म्हणून ह. भ. प गहिनीनाथ महाराज औसेकर हे उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध सिने अभिनेत्री तथा मिस इंडिया फायनलीष्ट नजर,हक्क,जवानी जिंदाबाद ग्लोबल अडगाव चित्रपट फेम प्रेरणा खरात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ.दिगंबरराव नेटके, अजिंठा, राजमाता जिजाऊ ग्लोबल अडगाव चित्रपट फेम अभिनेते साहेबराव पाटील, आयोजक रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती डॉ. बासिदखान पठाण यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदपूर परिसरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.