आंबेडकरांना त्यांच्या अनुयायांच्या नजरेतून समजून घेणे महत्त्वाचे – डॉ श्रीराम गव्हाणे
उदगीर (एल.पी.उगीले) : युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या भोवतीचे वलय, त्यांचा संघर्ष आणि कर्तत्व अनाकलनीय होते. त्यांच्यात दडलेला विद्वान शिक्षक, वकील, लेखक, राजकारणी, वृत्तपत्र आणि विविध पक्ष- संस्थांचे संस्थापक अशा विविध घटनांनी भरलेले त्यांचे आयुष्य यांना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या सहवासातील अनुयायांच्या नजरेतून समजून घेणे गरजेचे ठरते. असे मत प्रा. डॉक्टर श्रीराम गव्हाणे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी नियमितपणे चालू असलेल्या वाचक संवादच्या 306 व्या पुष्पात सलीम युसूफजी यांनी संपादित केलेल्या आंबेडकर अनुयायांच्या नजरेतून या साहित्यकृतीवर डॉ. श्रीराम गोविंद गव्हाणे मराठी विभाग प्रमुख लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद, नांदेड यांनी संवाद साधला. यावेळी अध्यक्ष म्हणून विद्यासागर डोरनाळीकर हे लाभले होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले पुस्तके जमवण्यातला आनंद, वाचण्याचे महत्व, संगीत- कलाकौशल्यातली आवड, त्यांच्या वस्त्र परिधान करण्याच्या सवयी, दिन- दलित व प्राणी मात्रावरील त्यांचे प्रेम, फाउंटन पेनांच्या संग्रहाची सवय याबरोबरच व्यसन व वाईट प्रथांना असलेला विरोध या सर्वांना समजून घेण्यासाठी दलित नेते व इतर त्यांच्या सहवासातील अनुयायांवर झालेला परिणाम. त्यांच्याकडूनच त्यांच्या आठवणींना उजाळा देत आंबेडकरांचे विचार, प्रेरणा त्यांची संवेदनशीलता त्यांचे तत्त्वज्ञान आणि प्रत्येकाच्या मनात रेंगाळणाऱ्या आठवणीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यांचे एकूण 22 अनुयायांचे संस्मरणीय लेख एकत्र करून ही साहित्यकृती तयार झालेली आहे. या साहित्यकृतीचे वाचन करून बाबासाहेबांचे अंतरंग आणि बहिरंग समजून घेता येऊ शकते.
यानंतर झालेल्या चर्चेत डॉ गायकवाड विश्वंभर, हणमंत म्हेत्रे, डॉ दत्ताहरी होनराव, रामभाऊ जाधव अर्चना पैके, अशा तोंडारे, प्रतिभा मुळे आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी डोरनाळीकर यांनी सुंदर अध्यक्षीय समारोप केला. या
कार्यक्रमास विशेष उपस्थिती प्रसिद्ध साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांची लाभली होती. कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. मल्लिकार्जुन तंगावार यानी केले तर आभार मुरलीधर जाधव यानी मानले. यशस्वीततेसाठी अनंत कदम, आनंद बिरादार, व्यंकट नेत्रगावकर, प्रवीण जाहुरे, राजेंद्र एकंबेकर आदींसह प्रयत्न केले .