सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाचा सहावा टप्पा पूर्ण,साधन व्यक्तीचा केला सत्कार
उदगीर (एल. पी. उगीले) : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाचा सहावा टप्पा ७ फेब्रुवारी रोज मंगळवार पासून मातोश्री मीनाताई ठाकरे आश्रम शाळेत घेण्यात आला. १० फेब्रुवारी रोज शनिवारी सहाव्या टप्प्याचे प्रशिक्षण शिक्षकांनी पूर्ण केले,या प्रशिक्षणात शिक्षकांना बदलत्या काळानुसार मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाने राष्ट्रीय धोरण आखले गेले,निपुण भारत अभियाना अंतर्गत शाळेतील मुलांना शिकवण्याच्या पध्दती,नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना शिकवणे,युट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे,मुलांना कोणकोणते कौशल्य अवगत झाले आहेत त्या विध्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे,मुलांचा सर्वांगीण विकास,सध्या दिवसेंदिवस वाढत असलेली नवनवीन टेकनोलॉजीचा शासनाने विचार करून राज्यातील सर्वच शिक्षकांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला याचाच एक भाग म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे,या प्रशिक्षणात शिवशंकर पाटील व एम.व्ही.मद्रेवार व भोळे जि.पी.या साधन व्यक्तींनी शिक्षकांना अगदी सोप्या पद्धतीने व व्हिडीओच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला. प्रशिक्षणाचा सातवा टप्पा १२ फेब्रुवारी रोज सोमवार पासून सुरू होणार आहे.