श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी विद्यार्थी स्वयंशासन दिन संपन्न
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी शहरात शाळा श्री योगेश्ररी मा.व उच्च मा.वि.देवणी येथे दिनांक 10/02/2024 रोजी ईयत्ता दहावी वर्गातर्फे विद्यार्थी स्वयंशासन दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक म्हणून हुलसुरे गौतम, उपमुख्याध्यापक म्हणून कोळेकर शिवकन्या, लिपिक म्हणून वालेकर हर्ष यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य हरकंचे राजकुमार, प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुलिंगेश्वर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंतराव पाटील, संस्थासंचालक पाटील आदित्य, महाजन, तसेच हुमनाबादे नागनाथ बाबुराव, घोणसे आनंद, सूर्यवंशी तुळशीराम, शेख शौकत, शेवाळे सतीश, मलवाडे रामदास, बिराजदार सतीश,बिराजदार विक्रम, कस्तुरे रवींद्र, पाटील शंकर, सूर्यवंशी धर्मेंद्र, वाघमारे शाम, बारोळे सुरेश, कार्तिक स्वामी ईत्यादी उपस्थित होते.याप्रसंगी राजकुमार हरकंचे, यशवंतराव पाटील, हुमनाबादे नागनाथ यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन घोरोडे स्नेहा यांनी तर आभारप्रदर्शन पिंजरे सुप्रिया यांनी केले. दहाविचे शिक्षक शेख समरीन, पठाण मेहक, सूर्यवंशी माया, रणदिवे स्वाती, कोळेकर शिवकन्या,गायकवाड शाहू, पठाण सानिया, व्यंजने अमृता, कांबळे पूजा,रणदिवे श्रीशांत, सूर्यवंशी स्वप्निल, वालेकर अक्षता,गायकवाड दिव्या, पिंजरे सुप्रिया,वाघमारे शिवाजी, कांबळे पूजा, म्हेत्रे भागवत, म्हेत्रे रागिनी, घोरोडे स्नेहा, सुमित सूर्यवंशी, रणदिवे भाग्यश्री, रणदिवे श्रद्धा, कांबळे अनुराधा, निरूडे आदित्य,गायकवाड भागवत, गदगे सुरेश, आदिनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या वेळी निरोप प्रसंगी उपस्थित शिक्षक, हुमनाबादे नागनाथ बाबुराव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.