ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे मागणी

0
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे मागणी

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे मागणी

लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्र सेवा दलाने ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावेत. यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲड.असिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असतांना हल्लेखोरानी अतिशय क्रुरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत, स्वतःचा व सोबतच्या व्यक्तींचा बचाव केला. या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून तसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर राज्य उपाध्यक्ष अजय सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार लिंबराज पन्हाळकर, शिवाजी कांबळे, डी एल वाघमारे, नेताजी जाधव, संजय बुच्चे, नाना शेख, कावेरी विभुते, गौसोदिन सय्यद, रसिका कांबळे आदींच्या सह्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *