युवकांना दिशा देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक – अनिता येलमटे

0
युवकांना दिशा देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक - अनिता येलमटे

युवकांना दिशा देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक - अनिता येलमटे

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय सेवा योजना मूल्य संवर्धन करणारी संस्था आहे. देश प्रेम, सामाजिक कार्य युवकांमध्ये वृद्धिगत करणारी कार्यशाळा आहे. महाविद्यालयीन युवकांना संस्कार देणारे ऊर्जा केंद्र म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेकडे आज पाहिले जाते. राष्ट्रीय सेवा योजना युवकांना घडवणारी कार्यशाळा आहे. भरकटलेल्या तरुणांना दिशा देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक आहे. नव्हे तर ती काळाची गरज बनली आहे त्याशिवाय मानवी संवेदनशीलता जपली जाणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिद्ध कथाकार अनिता येलमटे यांनी केले. उदगीर येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दावणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवक शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील होते. मंचावर प्रमुख अतिथी डॉ. विजयकुमार भांजे, तानाजी फुले, प्राचार्य शिवहार रोडगे, संस्था कोषाध्यक्ष मृदुला पाटील, बबन पाटील, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश बेळंबे, डॉ. बाबुराव जाधव आदींची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते अनिता येलमटे यांनी कविता व कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रा. डॉ. विजयकुमार भांजे, प्राचार्य शिवहार रोडगे, मृदुला पाटील, डॉ. विजयकुमार पाटील यांचे यथोचित भाषण झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी साक्षी पूनमवार, विद्यानंद कांबळे यांना आदर्श स्वयंसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश बेळंबे यांनी केले,तर सूत्रसंचालन मच्छिंद्र कांबळे, आभार डॉ. बाबुराव जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जोगन मोरे, डॉ.मदन शेळके, रोहित चौधरी, दिनकर जाधव, शफी शेख, पांडुरंग फुले, यशवंत मोरतळे, तुकाराम फुले आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *