पो. नि. सुनील रेजीतवाड यांची उत्कृष्ट कामगिरी !! घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेलची वारी !!
लातूर (एल.पी.उगीले) : चोऱ्या घर पुढे अशा स्वरूपातील पुण्याला प्रतिबंध करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वेळोवेळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचा आदर करत औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीचा तपास करून आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे औसा हद्दी मध्ये राहते घराचा कडी- कोयंडा तोडून स्कुटी, मोबाईल, सोन्याचे झुमके व नगदी रक्कम चोरल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे औसा येथे गु.र.नं 35/2024 कलम 379,380 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,औसा उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकाने केलेल्या परिश्रमामुळे पथकाला गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून घरासमोर लावलेली स्कुटी गाडी, घरातील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला निष्पन्न करून त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे साहिल महबूब सय्यद, (वय 22 वर्ष ,राहणार टेंभी, तालुका औसा).याला त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांने वर नमुद गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाला पैकी एक स्कुटी गाडी, मोबाईल असा मुद्देमाल हजर केल्याने नमूद आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच अटक आरोपीकडे आणखीन विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतून एक मोबाईलची चोरी केली असून त्यासंदर्भात पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशाप्रकारे औसा पोलिसांनी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून घरासमोर लावलेली स्कुटी गाडी, मोबाईल रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून औसा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, औसा उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक कांबळे, पोलीस अमलदार भुरे,पाटील, गोमारे यांनी केली आहे.