शिक्षण आभूषण डी.बी. लोहारे गुरुजी – राजकुमार पाटील

0
शिक्षण आभूषण डी.बी. लोहारे गुरुजी - राजकुमार पाटील

शिक्षण आभूषण डी.बी. लोहारे गुरुजी - राजकुमार पाटील

महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात लातूर जिल्ह्याची जी क्रांती झाली त्या क्रांतीचे जनक अहमदपूरचे आदरणीय डी.बी. लोहारे गुरुजी हेच आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुरुजींना दलित मित्र पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
आदरणीय गुरुजींचा 90 वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान आहे. गुरुजींच्या शाळेची मीनाक्षी नलबले ही महाराष्ट्रात सर्वप्रथम आली तेव्हापासून ते आज पर्यंत निकालात शिक्षणाचा दर्जा वाढत चाललेला आहे.
या प्रगती मागे आदरणीय गुरुजींचे गांधीवादी विचार सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य याचमुळे हे यश संपादन होत आहे.
स्वतः खादीचे कपडे वापरून शाळेतील सर्व कर्मचारी विद्यार्थी खादीचा गणवेश वापरतात. ज्या आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांना शेवटपर्यंत शिक्षकांनी जपलं पाहिजे म्हणून त्यांनी माता-पिता योजना सुरुवात केली. शिक्षकांनी चांगले कार्य केले पाहिजे म्हणून सतत ते आपल्या बैठका मधून शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करतात आणि सर्व शिक्षक त्यांचे चांगले विचार ऐकून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य अविरत करत आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो पिणारा गुरगुरणारच हाच विचार करून गुरुजींनी इ.सन. 1956 ते 1962 या काळात शिक्षकाची नोकरी स्वीकारली मुलांना चांगले शिक्षण देण्याचे ठरवले. महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या विचारधारेनुसार स्वामी रामानंद तीर्थ यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन मूळकी उमरगा तालुका अहमदपूर येथे पहिल्या शाळेची सुरुवात त्यांनी केली आणि आज पर्यंत त्यांनी 11 शाळेतून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून क्रीडा, चित्रकला, स्कॉलरशिप, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी नावलौकिक कमवत आहेत.
क्रीडा क्षेत्रात यावर्षीचा आलेख पाहिला तर 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता 200 विद्यार्थी विभाग स्तरावर खेळले 70 विद्यार्थी राज्य स्तरावर खेळले व पाच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळून त्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली विशेष म्हणजे तीन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त विजेते ठरले आहेत. एका विद्यार्थ्यांची खेलो इंडिया साठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
गुरुजींनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार करून मुलीही मागे नाहीत हे दाखवून दिले देश पातळीवर मुलीचा क्रिकेटचा संघ नेतृत्व करत आहे. त्यात गुरुजींच्या शाळेच्या सात मुली आहेत.
महात्मा गांधीजी म्हणतात खेड्याकडे चला हा विचार आदरणीय गुरुजींनी स्वीकारून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केल्या.
ग्रामीण भागातील श्री महादेव विद्यालय धनेगाव तालुका देवनी येथील प्रयोगशाळेचा प्रयोग गेल्या पंधरा वर्षापासून राज्यस्तरावर जात आहे. तेथील शाळेत अटल प्रयोगशाळा शासनाने मंजूर करून दिली आहे. 1972 साली गुरुजींना वसुंधरा रत्न राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना अध्यक्ष होण्याची विनंती केली. गुरुजींनी शैक्षणिक कर्तुत्वावर सामाजिक समर्पणाच्या बळावर आध्यात्मिक विचारसरणी जोपासत सबंध महाराष्ट्रात नावलौकिक कमावला. अहमदपूर ,कुमठा, कबनसांगवी ,रोकडा सावरगाव, धनेगाव , मुरढव या ग्रामीण व दुष्काळी भागात ज्ञानगंगा प्रवाहित केली. त्यामुळे हजारो यशवंत ज्ञानाची पताका नांदेड ते न्यूयॉर्क, अहमदाबाद ते ऑस्ट्रेलिया जगभर फडकवत आहेत. अतिशय संवेदनशील संस्कारीक मनाने गुरुजींनी शिक्षण संस्थेचा विकास केला .या शिक्षण प्रसाराच्या कार्याचा सन्मान 2002 साली महाराष्ट्र शासनाने टागोर शिक्षण समिती राज्य आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या आदर्श शिक्षण संस्था चालवत गुरुजी आज 90 वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहेत म्हणतात माझं शरीर थकले पण मी विचारांनी आणखी तरुण आहे. यावरूनच असे लक्षात येते की आणखीही गुरुजी आपले कार्य सतत चालू ठेवत आहेत. आजही गुरुजी थांबले नाहीत. त्यांची दिनचर्या दररोज चालू आहे दररोज सकाळी योगासने ,प्राणायाम, प्रार्थना यापासून ते आपल्या कार्यास सुरुवात करतात.
आदरणीय गुरुजींना शंभर वर्षाचे आयुष्य लाभो हीच याप्रसंगी प्रार्थना.

  • राजकुमार पाटील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *