संसारातील सुखाची बेरीज व दुःखाची वजाबाकी म्हणजे श्रीमद् भागवत कथा – ह.भ.प दिलीप महाराज मुसळे
किनगाव (गोविंद काळे) : विठ्ठल रुक्मिणी व महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित दिव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात पहिल्या दिवशी कथा सांगताना संसारातील जीवाला सुख पाहिजे असेल आणि दुःख नको असेल तर प्रत्येक मनुष्याने जीवन जगत असताना एकदा तरी श्रीमद् भागवत कथेचे श्रवण करावे याची फलप्राप्ती काय आहे तर जीवनातील दुःख नाहीसे होते व सुख अनुभवायला मिळते तसेच आपल्याकडुन कळत नकळत काही पापं घडतात त्या पापाचे दोष आपल्याला लागु नये असं वाटत असेल तर जीवनात एकदा तरी श्रीमद् भागवत कथेचे श्रवण मनुष्याने केले पाहिजे असे प्रतिपादन श्री ह भ प भागवताचार्य दिलीप महाराज मुसळे यांनी कथेच्या पहिल्याच दिवशी केले कथा श्रवणासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती हा कार्यक्रम सुभाष पाटलोबा गुट्टे व गुट्टे परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे इथुन पुढे सहा दिवस दिव्य श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा परिसरातील भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती गुट्टे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.