शिरूर ताजबंद च्या महादेव मंदिराचे पुजारी वीरभद्र स्वामी यांचे दुःखद निधन
अहमदपूर : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामदैवत महादेव मंदिराचे ज्येष्ठ पुजारी वीरभद्र गंगाधर आप्पा स्वामी यांचे दिनांक 11 रोजी रविवार सायंकाळी पाच वाजता अहमदपूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 12 रोज सोमवार सकाळी 11 वाजता शिरूर ताजबंद येथील आंबेगाव रोडवरील त्यांच्या शेता मध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून ते शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्य लिपिक शिवसांब स्वामी यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.