निपिडच्या सिकंदराबाद येथील राष्ट्रीय मेळाव्यात उदगीरच्या जिवन विकास निवासी मतिमंद शाळेचे यश
उदगीर (एल.पी.उगीले) : बुद्धिबाधित दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, कलागुण, कौशल्यगुण, स्वतःची वकिली करणे आदीवर आधारित “दोन दिवसीय राष्ट्रीय मेळावा” सिकंदराबाद येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान (निपिड) येथे आयोजित करण्यात आला होता. देशातील 15 हून अधिक राज्य यात सहभागी झाले होते. कौशल्य-स्पर्धा या क्षेत्रात केरळ राज्याच्या एका संस्थेने प्रथम स्थान पटकावले तर ग्रामीण भागात बुद्धिबाधित दिव्यांग (मतिमंद) व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन पायावर उभे करण्याचे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या उदगीर जि. लातूर येथील जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेच्या व्यवसाय उपक्रमाला द्वितीय स्थान मिळाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे, कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.