इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचा विक्रम : शासनाच्या एनएमएमएस परीक्षेत उदगीर तालुक्यातील पहिल्या 10 मध्ये 10 विद्यार्थी इच्छापूर्तीचेच!!
विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाख रुपयापेक्षा जास्त रुपयांची रोख शिष्यवृत्ती !!
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेत उदगीर तालुक्यातील पहिल्या दहा विद्यार्थ्यां मध्ये दहाही विद्यार्थी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे आले असून क्लासेस मधून एकूण बसलेल्या 28 विद्यार्थ्यापैकी 25 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. हाही एक नवीन विक्रम इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने निर्माण केला आहे. उदगीर येथील दरवर्षी विविध शैक्षणिक विक्रम घडवीणाऱ्या प्रा. सिद्धेश्वर पटणे यांच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसने शासनाच्या एन एम एम एस या परीक्षेत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या मध्ये पात्र ठरणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने एकूण जवळपास 10 लाखापेक्षा जास्त रुपयांची रोख शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याशिवाय या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शासकीय फीस माफ होऊन पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार आहे. या परीक्षेत उदगीर तालुक्यातून आर्या वासुदेवणे द्वितीय , गायत्री भोसले तृतीय, आदित्य स्वामी चौथा, विष्णू वाघमारे पाचवा, साक्षी बिराजदार पाचवा, समीक्षा चवळे सहावा, दिपक झमकडे सातवा, योगेश मुंडे आठवा, श्रुती भांगे नववा, ख़ुशी कमलापुरे दहावा क्रमांक पटकावला असून विद्यावर्धिनी शाळेतून आदित्य स्वामी प्रथम, विष्णू वाघमारे द्वितीय तर दिपक झमकडे तृतीय म्हणजे शाळेतील पहिले तीन विद्यार्थी इच्छापूर्तीचेच आहेत, याशिवाय श्यामलाल स्मारक विद्यालयातून ख़ुशी कमलापुरे ही प्रथम आली आहे तर लालबहादूर शास्त्री विद्यालयातून आर्या वासुदेवणे द्वितीय, गायत्री भोसले तृतीय, साक्षी बिराजदार पाचवा , समीक्षा चवळे सहावा, योगेश मुंडे सातवा, श्रुती भांगे आठवा क्रमांक पटकावून प्रत्येक शाळेत इच्छापूर्तीचाच झेंडा उंचावुन त्यांनी स्वतः बरोबर आईवडिलांचे, क्लासेसचे व आपल्या शाळेचे नाव महाराष्ट्रभर उंचावले आहे.
या विद्यार्थ्यांशिवाय इच्छापूर्तीचे सिद्धेश्वर नागरगोजे, विश्वजित राठोड, ज्ञानेश्वर देवकत्ते, आदर्श कांबळे, जीत होंडे, प्रतिक जाधव, भगवान केंद्रे, प्रविण बडे, अमित शिंदे, नेहा जाधव, अंकिता म्हेत्रे, श्रुती तलवाडे, धनश्री केंद्रे, प्रिती मुंडे इत्यादी विद्यार्थी घवघवीत यशासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह क्लासेसच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. अशा या दैदीप्यमान, अतुलनीय यशाबद्दल इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस दरवर्षी उदगीरचे नाव महाराष्ट्रभर उंचावते आणि असा शैक्षणिक इतिहास फक्त इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच घडवू शकते अशी चर्चा विद्यार्थी, पालक व उदगीर परिसरातील नागरिकांमध्ये चालू आहे. या यशवंत विद्यार्थ्यांना इच्छापूर्तीचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांच्याशिवाय क्लासेसमधील तज्ञ् शिक्षक प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.ज्ञानेश्वर केंद्रे, प्रा.श्रद्धा चंदे, प्रा.संजय जामकर, प्रा.अशरफ खान यांचे मार्गदर्शन लाभले. या अतुलनीय यशाबद्दल व विद्यार्थ्यांना एवढी शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबद्दल यशवंत विद्यार्थ्यांबरोबरच इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे व क्लासेसमधील सर्व शिक्षक वृंदाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.