राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोफत नेत्र रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग, अल्पसंख्यांक विभाग,सामाजिक न्याय विभाग तर्फे राजर्षी शाहू विद्यालय येथील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व दंतरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या समारंभास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक माधवराव कल्याणे तर या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्ह्य कार्याध्यक्ष अॅड दिपाली औटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून रंजीत कांबळे, शिबीराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग जिल्ह्यध्यक्ष अभिजीत औटे, अल्पसंख्यांक विभाग जिल्ह्यध्यक्ष शफी हाश्मी, सामाजिक न्याय विभाग जिल्ह्यध्यक्ष प्रदिप जोधंळे यांच्या वतिने करण्यात आले होते. या वेळेस शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी डाॅ स्मिता वंजे, उदयगीरी लायन्स नेत्र रुग्णालयचे जनसंपर्क अधिकारी गणेश मुंडे यांनी प्रयत्न केला. सदरील शिबीरात 400 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.