शालेय जीवनामध्ये संस्कार आणि अभ्यास महत्त्वाचा – प्रा. डॉ.सुनिताताई चवळे लोहारे
अहमदपूर (गोविंद काळे) : मानवी जीवनामध्ये शिक्षणाचे अनेक टप्पे असतात पण त्यात पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते म्हणून शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना संस्कार आणि अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असून त्यातूनच देशाचा चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण होतो असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीच्या सहसचिव तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर सुनिता ताई चवळे लोहारे यांनी केले.
त्या दि. 17 रोजी स्वयंशासन दिनाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शिका म्हणून यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे ,उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, प्रर्यवेक्षक अशोक वैद्यवाड, राम तत्तापुरे, स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक दीप्ती देशमुख, उपमुख्याध्यापक महेश सावरगावे, सायली भगत, पर्यर्वेक्षक अपूर्वा कोरे, धनश्री साबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रा.डॉ.सुनिता चवळे म्हणाल्या की, मोबाईलचा जपून वापर करा, मुला मुलींनोश चारित्र्यसंपन्नप बना, ज्या क्षेत्रात जाल त्यात एक नंबर काम करा, घाबरू नका, प्रामाणिकपणे काम करा असे जाहीर आवाहन केले.
यावेळी स्वंय शासन दिनाच्या सहशिक्षिका विद्या गुट्टे, निसर्ग चाटे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार डॉक्टर शरद करकनाळे यांनी मांनले.
यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या स्वयंशासन दिनातील सहशिक्षिक निसर्ग चाटे, श्रावणी पाटील, रेवा जोशी, गायत्री सोळंके, जय भारती यांचा डॉक्टर सुनिता ताई चवळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक अरुण मोरे, कपिल बिराजदार ,स्वय शासन दिनाचे परीक्षा प्रमुख अवनी देशमुख, चैत्राली चलवदे, आदिती येरमे ,नम्रता शेटकार , वैभवी सोनी, क्रीडा शिक्षक श्रेयस मुस्तापुरे, ओम मद्रेवार, शुभम राठोड ,संकेत केंद्रे ,आदित्य फाजगे, प्रेम मध्येवाढ यांच्यासह यशवंत विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.