अतनूर परिसरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

0
अतनूर परिसरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

अतनूर (प्रतिनिधी) : १९ फेब्रुवारी हा छञपती शिवाजी महाराज यांचा ३९४ वा. शिवजन्मोत्सव जळकोट तालुक्यातील अतनूर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव दिनानिमित्त शिवाजी चौकात छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष कैलास गोविंदराव सोमुसे-पाटील व अतनूर सज्जाचे तलाठी अतिक शेख यांच्या हस्ते माल्यार्पण अर्पण करून सर्वपक्षीय विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बीट जमादार एस.जी.गुडाप्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबुराव कापसे, शिवसेनेचे जिल्हासरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील अतनूरकर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, माजी सैनिक केशवराव पाटील, उपाध्यक्ष बालाजी येवरे-पाटील, सचिव रवी पांचाळ, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव,तंटामुक्त अध्यक्ष मगदूम मुंजेवार, भाजपाचे जळकोट तालुकाउपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते एस.जी.शिंदे, मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष युवानेते योगेश नरसिंगराव उदगीरकर, माणिकराव साळुंके-पाटील, माधव बोडगे, अमोल पाटील, सुरज पाटील, योगेश पाटील, गोविंद बारसुळे, पप्पू सोमुसे, श्रीकांत बोडेवार, सुर्यकांत पांचाळ, गोविंद कोकणे, योगेश नरसिंगराव उदगीरकर, वैभव सूर्यवंशी, राहुल चिलमे, सुदाम बाबर, माजी सरपंच दिलीप कोकणे, गंगाधर वाघमारे, माजी उपसरपंच गोरोबा गायकवाड, साळुंके-पाटील, अमोल साळुंके-पाटील, चंदर गायकवाड, राघोबा गायकवाड, श्याम गुंडीले, शिवराज पंचगले, कापडे, बोडेवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे उपस्थित होते. तसेच अतनूर येथील विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सामाजिक संस्था तसेच लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर यांच्या कार्यालयातही शिवजयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे हे होते. तर प्रमुखपाहुणे म्हणून विधावर्धिनी इंग्लिश स्कुलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, अविनाश शिंदे, महिला मंडळाच्या प्रदेशध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.शुभांगना कणसे, वसुंधरा महिला मंडळाच्या प्रदेशअध्यक्षा सौ.रूक्मीण सोमवंशी, सचिव सौ.संध्या शिंदे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, सौ.शोभा शिंदे, सचिव श्रीमती शकुंतला बाबर, सौ.मोहिनी शिंदे, हणमंत साळुंके, अभिजीत सोमुसे, ज्ञानेश्वर जाधव, अकुंश बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन व्यंकटेश बी.शिंदे यांनी केले.तर आभार मयुरी बी. शिंदे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *