प्रहार जनशक्ती व प्रहार अपंग क्रांती च्या वतीने रस्ता रोको आंदोलन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर व जळकोट तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रमुख मागणी करीता दिनांक ०1/०3/२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने असे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर यांना देण्यात आले . प्रहार जनशक्ती पक्षानी विविध मागणीसाठी अनेक वेळा संबंधीत अधिकारी यांना निवेदने देऊन व समक्ष भेटून, फोनद्वारे वारंवार कळवून देखील शासन निर्णयानुसार अमलबजावणी करण्यात आलेली नाही.दिव्यांगाच्या विविध मागण्या मान्य न झाल्याने दिनांक ०1/०3/२०२४ वार शुक्रवार रोजी रास्ता रोको आंदोलन करुन संबंधीत अधिका-यांचा निषेध प्रहार व दिव्यांगाच्या वतीने करण्यात येणार आहे.
दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या दिव्यांग बांधवाना व्यवसाय करण्यासाठी नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या मालकीचे ५ टक्के गाळे राखीव ठेवून विनामुल्य दिव्यांगाना मिळालेच पाहीजेत. दिव्यांग बांधवाना अंत्योंदय ३५ किलो धान्य, अन्न योजनेचा लाभ शासन निर्णयानुसार देण्यात यावे.दिव्यांगाचे बीज भांडवल कर्ज माफ करावे. दिव्यांग बांधवाना २०० स्वेअर फुट जागा शासन निर्णयानुसार उपलब्ध करुन द्यावी.
उदगीर तालुका व जळकोट तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग भवन बांधण्यात यावे. दिव्यांगाना इतर राज्य पुरस्कृत योजना प्रमाणे मोदी आवास योजने अंतर्गत ५ टक्के ठेवण्याकरिता अमलबजावणी करुन घरकूल देण्यात यावे. दिव्यागाना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावे.बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर देण्यात यावी. व घरपट्टी माफ करावी. 5 टक्के निधी सर्व ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत दिव्यांगाना निधी वाटप करावा. उदगीर जळकोट तालुक्यातील शहरातील ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत दिव्यांग हक्काचा ५ टक्के निधी उत्पनाच्या नियमानुसार वाटप न करणा-या संबंधित अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
दिव्यांगाना बीज भांडवल योजने अंतर्गत कर्ज देण्यात वित्त विकास महामंडळाकडून नवीन कर्ज विनाअट मिळावे.अंत्योदय शिधापत्रीका
योजनेत तात्काळ सामावून घ्यावे. सर्व शासकीय योजना, व सुविधा यांची माहिती दर्शविणारे दिव्यांग मार्गदर्शन केंद्राची स्थापना करावी.
फलक संबंधीत अधिकारी यांचे मोबाईल नंबर टाकून दर्शनी भागात लावण्यासाठी सक्ती करावी. सरकारी हॉस्पीटल आरोग्य विभागात दिव्यांग बांधवाना आसन व्यवस्था प्राधान्यक्रम देवून दिव्यांग माहिती फलक लावण्यास सक्ती करावी. दिव्यांग पदाधिकरी यांना तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था या कमेटीवर
व समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करावी. आमदार व खासदार यांच्या निधीतून दिव्यांग यांना उदगीर व जळकोट तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या कल्याणासाठी भरीव निधी तात्काळ मिळावे. दिव्यांग २०१६ कायद्याची अमल बजावणी करण्यात यावी. उदगीर तालुक्यातील नगर परिषदेतील दिव्यांग 5 टक्के निधि बेहिशोबी वाटप करुन दिव्यांगाची दिशाभूल करणारे संबंधिताची चौकशी करुन संबंधीत न. प. अधिकारी यांना निलंबीत करण्यात यावे.
अनेक शासन नियमाचे उलंघन करणारे संबंधित अधिकारी यांचा निषेध म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, जिल्हा प्रवक्ते बडेप्पा पडसलगे, उदगीर तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे, ग्रामीण उपाध्यक्ष संदीप पवार, संघटक सोपान राजे,शहर कार्याधयक्ष शहाजान शेख, सहसंपर्क प्रमुख शोएब मुन्सी, शहर उपाध्यक्ष इमरान शेख,सरचिटणीस सुदर्शन सुर्यवंशी,बळीराम चौधरी,निळकंठ मुदोळकर, जिल्हध्यक्षा कांचन भोसगे, उपजिल्हा प्रमुख प्रेमलता भंडे, ता.अध्यक्ष विजयमाला पवार,शहर अध्यक्षा जयश्री पाटील, संघटक श्रीदेवी बिरादार, सरचिटणीस जयश्री चव्हाण,शोभा बिरादार, पवार व्ही.ए. यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.