व्यापारी संकुल उद्योग भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील व्यापारी संकुल उद्योग भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी करण्यात आली. यावेळी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजे माजी सैनिक अनिल मुळे व कुमारी प्राजक्ता सर्जेराव भांगे. उद्योग भवन येथील सर्व व्यापारी मागच्या वर्षापासून या आगळ्या वेगळ्या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करत आहेत. याचे वेगळेपण हे या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले प्रमुख पाहुणे आसतात. जसे कि या वर्षांचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक यांनी अखंड 16 वर्ष देशसेवा बजावली असुन त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही व्यक्तिगत रजा घेतली नाही. तर कुमारी प्राजक्ता हिने नुकत्याच पार पडलेल्या भारतीय छात्र सांसद या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पहीली आली. अशा प्रकारे जंयती सोहळ्यास राजकिय पुढाऱ्यांना आमंत्रित करण्या ऐवजी युवकांना प्रेरणा देणार्या व्यक्तिमत्त्वांचा परीचय या ठिकाणी घडवून आणतात. यावेळी आयोजक मंडळातर्फे अल्पोपाहाराचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ. अशोक बिरादार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व सराफा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष फुलारी, सराफा व्यापारी अरविंद चामले, दत्तात्रय चंडेगावे, अंगद वाडीकर, उद्धालीक निधी लिमिटेड चे संचालक शंकर देबडवार,संतोष चन्नावार, प्रदीप बिरादार, ज्योतिबा भांडी स्टोअर चे रविकिरण बिरादार व उद्योग भवन येथील इतर सर्व व्यापाऱ्यांनी आपले योगदान दिले व उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार सुद्धा गोपाळ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष बिरादार यांनी केले.