आखनापूर गावातील आगळेवेगळे स्नेहसंमेलन व छत्रपती शिवाजीमहाराज जयंती
उदगीर (एल.पी.उगीले) : सीमा भागामध्ये कमालनगर तालुक्यातील दापका सर्कल मधील खानापूर या छोट्याशा वाढीमध्ये गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा टिकवण्यासाठी व त्याचा दर्जा वाढविण्यासाठी गावातील तरुणांनी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.
आकानापुर गावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त दरवर्षीप्रमाणे शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या वर्षी काहीतरी वेगळ करायचा धाडस संपूर्ण गावातील तरुणांनी उराशी बाळगून छत्रपती शिवाजीमहाराजां प्रमाणे देशाच्या भावी पिढीला उत्तम शिक्षण व दर्जेदार शिक्षण मिळावे असे धेय ठेवून गावातील ज्येष्ठ नागरिक व नवतरुण युवकांनी गावातील मंडळींना आवाहन केले .
बक्षीस हे पुस्तक, वह्या, पेन न देता पैशाच्या स्वरूपात देऊन ते पैसे एकत्र ठेवण्यास, त्या पैशाचा उपयोग विद्येचे पवित्र मंदिर शाळा आहे, त्यासाठी केला जावा. शाळेला देणगी देणाऱ्यांची संख्या कमीच असते. मंदिर उभा करण्यासाठी हजारो, लाखो रुपये देतात, भाविक पण शिक्षण क्षेत्रासाठी कोणीही देत नाही असा पवित्र निर्णय गावकऱ्यांनी घेतला. गावकऱ्यांकडून ताबडतोब प्रतिसाद मिळाला व सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात पैसे देऊन एका तासात रोख 70000 हजार रुपये जमा झाले, आणि त्याठिकाणी गावातील महिलांनी असे सांगितल की, मंदिराचा कळस स्थापनेसाठी ज्याप्रमाणे बायलेकी मदत करतात. त्याप्रमाणेच या विद्येच्या मंदिराचे कळसारोहनासाठी आम्ही गावातील महिला मंडळ एकत्र येणार आहोत, व तुम्हाला उर्वरित 30000 रु आम्ही गावातील बायलेकि जमा करून देऊ, असा शब्द दिला. असे एकूण 100000 रु शाळेसाठी गावातील मंडळींनी शाळेला जमा करून दिले. हे अतिशय कौतुकास्पद उपक्रम या आखनापूर सारख्या अवघ्या 200 मतदान असलेल्या गावकऱ्यांनी करून दाखवला आहे.
परिसरातील गावांनी आदर्श घेण्यासारखा उपक्रम करून दाखविले आहे. खर पाहता पंचक्रोशीतील ईतर गावांनी याचा आदर्श घेत असे अनोखे व आदर्श समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे ध्येय या ठिकाणी ठेवले पाहिजेत. या उपक्रमातून आकनापूरकर वेध प्रशिक्षणाचा लागला व या गावातील विद्यार्थ्यांचा एवढा मोठा फायदा झाला. या छोट्याशा गावातील बरेच विद्यार्थी अनेक कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. हेच संस्कार घेऊन हे विद्यार्थी वाढतील व असाच आदर्श वारसा जपतील. खरे पाहता तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या कार्याची दखल घेऊन या निधीत आपलाही हातभार लावला पाहिजे.या गावात अतिशय भव्य दिव्य, आधुनिक तंत्रज्ञान युक्त शाळेची निर्मिती करावी. यात गाववाल्यांची निधी असल्यामुळे ती शाळा चांगल्या पद्धतीने चालते, आणि शाळेकडे गावाचे सुद्धा लक्ष व्यवस्थित राहते. कर्मचारी सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. आणखी त्यांच्या कार्याला गती येते. या गतीतून सर्कलचा विकास होण्यास वेळ लागत नाही. या गावातील लोकसंख्या जरी कमी असल्याने विद्यार्थी संख्या सुद्धा कमीच आहे. पण या गावातील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी माध्यमिक शाळेत चांगल्या गुणांनी प्राविण्य मिळवीत आहेत. आणखी चांगल्या पद्धतीने मिळवतील अशी अपेक्षा गावातील सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे. गाववाल्यांनी त्यांच्या कृतीतून एक आदर्श असे दर्शन घडवत आहेत. असे विचार अंकुश लक्ष्मणराव वाडेकर यांनी व्यक्त केले आहे.