नाबालक बनले गाळ वाहतूकीच्या ट्रॅक्टरचे चालक

0
नाबालक बनले गाळ वाहतूकीच्या ट्रॅक्टरचे चालक

नाबालक बनले गाळ वाहतूकीच्या ट्रॅक्टरचे चालक

हाळी-हंडरगुळी (प्रतिनिधी) : रोडवर अपघाताची शक्यता;प्रशासन कधी घेणार दक्षता. हंडरगुळी {विठ्ठल पाटील} मागील कांही दिवसापासुन हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा डे-नाईट धुमधडाक्यात होत असल्याचे आणि गाळाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरचे बहूतांश चालक हे नाबालक असल्याचे चिञ हाळी मध्ये दिसते.तसेच गाळाची ओव्हर लोड वाहतूक करण्यासाठी तसेच मिसुरडं ही न फुटलेल्या नाबालकांना ट्रॅक्टर चालवण्यासाठी परवाना दिला कोणी आणि या गावातील व परिसरातील आमआदमीच्या जिवावर उठलेल्या नाबालक असलेल्या ट्रॅक्टर चालकां – वर कांही कागदपञ नसलेल्या पण गाळ वाहतूक करणा-या ट्रॅक्टर्सवर कारवाई करणार कोण व कधी ? एखादा अपघात झाल्यावर कारवाई करणार का ? असे प्रश्न सुज्ञ हाळी व हंडरगुळीकरातुन चर्चीले जातात. 2 व्हिलर गाडी चालवायची असेलतर संबंधित गाडीच्या कागदपञासह चालकाकडे लायसंन्स हवे असते.पण या गावात माञ मोठ मोठी लोडेड वाहने मिसुरडंही न फुटलेली पोरं बिनधास्तपणे सुसाट पळवतात.याचे कारण म्हणजे आजवर येथे एकाही चालकावर कारवाई करायचे धाडस केले नाही.म्हणुनच शेकडो नाबालक मंडळी मोठमोठी ओव्हरलोड वाहने सुसाट चालविताना दिसतात.अगदी असाच प्रकार गाळ वाहतुक करणारे ट्रॅक्टरच्या कांही चालकाबाबत दिसुन येतो.कारण गाळ वाहतूक करणा-या पैकी कांही ट्रॅक्टरचे सर्व कागदपञ नाहीत.अशी चर्चा आहे.तसेच येथे ओव्हरलोड गाळ भरुन कांही बालक हे सुसाटपणे ट्रॅक्टर चालवित असल्याचे चिञ हाळी-हंडरगुळीत दिसत आहे.तरी पण आजवर एकाही ट्रॅक्टरवर तसेच चालकावर कारवाई करण्याचे धाडसकुणीही दाखविले नसल्याने अपघाताची शक्यता वाटते. आणि एखादा अपघात होऊन एखाद दुसरा मेल्यावरच कारवाई करण्याचे धाडस आरटीओ विभाग दाखविणार का ? तेंव्हा संबंधित प्रशासनातील वरिष्ठांनी येथून उदगीर-अहमदपुर जाणा-या रोडवर थांबावे.आणि मगच याप्रकरणी योग्यती कारवाई करावी. जेणेकरुन होणारा अपघात टळेल. तेंव्हा कारवाई करण्याचे धाडस कोण व कधी दाखविणार.याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *